१० वर्ष प्रेम, लग्नाच्या काही तासांनंतर आत्महत्या; अशी होती क्रूर हुकूमशहा हिटलरची लव्हस्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 03:00 PM 2022-04-20T15:00:30+5:30 2022-04-20T15:20:11+5:30
Adolf Hitler Lovestory : हिटलरला ड्रॉइंग काढण्याची खूप आवड होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला होता. जगातला सर्वात क्रूर हुकूमशहा अडॉल्फ हिटलर याला मानलं जातं. त्याचा जन्म २० एप्रिल १८८९ मध्ये झाला होता. हिटलरने जर्मनीवर शासन केलं, पण त्याचा जन्म ऑस्ट्रियामध्ये झाला होता. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, दुसऱ्या महायुद्धात रशियाकडून पराभूत झाल्यावर हिटलरने आत्महत्येचा निर्णय घेतला होता. मृत्यूच्या काही तासांआधी त्याने त्याची लॉंग टाइम गर्लफ्रेन्ड इवा ब्राउनसोबत लग्न केलं होतं. त्याच्या काही तासांनंतरच त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती.
हिटलरला ड्रॉइंग काढण्याची खूप आवड होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला त्यात यश मिळालं नाही. त्यानंतर तो राजकारणाकडे वळला. यादरम्यान तो पोस्टकार्डवर चित्र काढून आपलं पोट भरत होता. याच काळात हिटलरच्या मनात यहूदी आणि समाजवाद्यांच्या विरोधात राग निर्माण झाला.
यादरम्यान जगात पहिलं महायुद्धा सुरू होतं. यावेळी हिटलरही सेनेत भरती होऊन जर्मनीकडून लढत होता. पहिलं महायुद्धा संपलं तेव्हा जर्मनीचा पराभव झाला. यानंतर हिटलरने सेना सोडली आणि जर्मन वर्कर पार्टीचा सदस्य झाला. जी नंतर नाझी पार्टी झाली. त्याच्या भाषणांमुळे त्याला मोठं समर्थन मिळालं.
यादरम्यान हिटलर एका तरूणीच्या प्रेमात पडला. ही एक यहूदी तरूणी होती. दोघांची पहिली भेट म्यूनिखमध्ये झाली होती. हिटलर त्यावेळी ४० वर्षांचा होता आणि इवा ब्राउन तेव्हा १७ वर्षांची होती. त्यावेळी हिटलरकडे इतका वेळही नव्हता की तो त्याच्या मनातलं सांगू शकेल. दोघेही १० वर्ष एकमेकांवर प्रेम करत राहिले.
१७ व्या वर्षी इवा म्युनिखमध्ये नाझी फोटोग्राफर हेनरिक हॉफमॅनच्या स्टुडिओमध्ये नोकरी करत होती. इथे हिटलरसोबत तिची पहिली भेट झाली होती. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. पण एकमेकांना सांगितलं कुणीच नाही. देशाला याबाबत कळू नये अशी हिटलरची इच्छा होती.
आपली विस्तारवादाची नीति पुढे नेण्यासाठी त्याने अनेक देशांवर आक्रमण केलं. यामुळे दुसऱ्या महायुद्धाची सुरूवात झाली. अनेक मोठ्या देशांनी हिटलरला थांबवण्यासाठी करार केले आणि एकत्र त्याच्या विरोधात लढले. १९४५ मध्ये अमेरिकन सेना आणि रशियन सेना हिटलर पकडण्यासाठी पुढे येत होत्या. एका महिन्यांपर्यंत हिटलर ब्राउनसोबत बंकरमध्ये लपून होता.
२९ एप्रिल १९४५ ला त्यांनी लग्न केलं. हे लग्न केवळ एक दिवसांसाठी होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ३० एप्रिलला आपल्या स्टाफला भेटल्यानंतर हिटलरने आपल्या लाडक्या दोन्ही कुत्र्यांना विष दिलं. हे विष सायनाइड होतं. हिटलरचा सुद्धा प्लान सायनाइड खाऊन आत्महत्या करण्याचा होता.
हिटलरने आपल्या मृत्यूआधी स्टाफला सांगितलं होतं की, मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जाळला जावा. हिटलर ख्रिश्चन होता. ख्रिश्चनांमध्ये मृतदेह दफन केला जातो. हिटलरला भिती होती की, जर त्याला दफन केलं तर लोक त्याचा मृतदेह खोदून काढतील आणि आपला राग व्यक्त करतील. स्टाफने त्याचा मृतदेह जाळला.