अफगाणिस्तानच्या सोशल मीडिया स्टारचे फोटो व्हायरल ; राष्ट्रपतींपेक्षाही जास्त आहेत फॉलोअर्स By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 06:05 PM 2021-03-08T18:05:10+5:30 2021-03-08T19:00:10+5:30
Afghanistan social media star ayeda shadab : आयदा आपल्या कंटेंटच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाला प्रमोट करते. तिनं अफगाणिस्तानची एक सकारात्मक प्रतिमासुद्धा लोकांसमोर ठेवली आहे. २९ फेब्रुवारीला अमेरिकेने तालिबानासह एक शांती करार केला. यानंतर मे २०२१ पर्यंत अमेरिकेच्या सगळ्या सैन्याच्या तुकड्या अफगाणिस्तानाहून हटवण्यात आल्या आहेत. तसंच तालिबान अफगाणिस्तान यांच्यातील हिंसा कमी करण्यासाठी अल कायदा सारख्या दहशतवादी संघटनांशी आपलं नातं नष्ट करण्यात येणार आहे. या कराराच्या एकावर्षानंतर अफगाणिस्तानची सुरक्षा हा सगळ्यात मोठा मुद्दा समोर आला आहे.
अशा स्थितीततही काही स्टार्स असे आहेत. ज्यांनी आपली ओळख टिकवून ठेवली आहे. आयदानं सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या आहेत. अफगाणिस्तानचे राष्टपती अशरप गनी यांच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स या मुलीचे आहेत.
ती आपल्या फॉओअर्सना स्टाईलशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देते. आयदा तिची स्टाईल आणि वेशभूषेच्या माध्यमातून अफगाणिस्तानची संस्कृती लोकांपुढे मांडू इच्छित आहे.
इनसायडर वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार आयदा म्हणते की, माझं मत असं आहे की, लोकांनी आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगायला हवं. पण अफगाणिस्तानात राहताना मनात नेहमी भिती असायची. पण काहीही झालं तरी आयुष्य तर जगावचं लागणार आहे.
आयदा आपल्या कंटेंटच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाला प्रमोट करते. तिनं अफगाणिस्तानची एक सकारात्मक प्रतिमासुद्धा लोकांसमोर ठेवली आहे. तिच्या म्हणण्यानुसार तिच्या फोटोवर अफगाणिस्तानच्या सौंदर्याबाबत नेहमी सकरात्मक कमेंट्स येत असतात.
एशियन फाऊंडेशन २०१९ मध्ये सर्वे ऑफ अफगान पीपल समोर आला होता. यात असं दिसून आलं होतं की, अफगाणिस्तानमधील फक्त १४ टक्के लोक इंटरनेटचा वापर माहिती मिळवण्यासाठी करत आहेत.