३५ वर्षानंतर घरात मुलगी जन्मली; नातीच्या स्वागतासाठी शेतकरी आजोबांनी थेट हेलिकॉप्टर पाठवलं By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 05:07 PM 2021-04-22T17:07:51+5:30 2021-04-22T17:11:25+5:30
After 35 Years Daughter Came In House Grandfather Celebrate Royal Welcome With Helicopter: ३५ वर्षांनी घरात मुलीचा जन्म झाल्याचा आनंद आजोबांना इतका झाला की, त्यांनी पीक विकून कमवलेल्या पैशातून तिचं जंगी स्वागत केले. गावकरीही बघत राहिले. देशात एकविसाव्या शतकातही काही ठिकाणी मुलींना ओझे समजले जाते. त्याचबरोबर बालविवाह, मुलींचा अशिक्षितपणा अशा अनेक दुष्परिणाम ऐकायला मिळतात. तिथे दुसरीकडे राजस्थानमधील नागौरमध्ये एक आदर्श उदाहरण सगळ्यांसमोर उभं राहिलं आहे.
नागौर जिल्ह्यातील कुचेरा भागातील निंबडी चंदावत या खेड्याबद्दल बोलत आहोत. या गावात, एका सामान्य शेतकरी कुटुंबाच्या घरात जन्मलेल्या मुलीच्या आगमनाचा उत्सव असा साजरा केला की आपणही हे जाणून आनंदी व्हाल. कोरोना संकटात मुलीच्या सन्मानाची ही बातमी तुम्हाला नकळत अभिमानास्पद वाटेल.
नागौरचे शेतकरी मदनलाल प्रजापत यांच्या घरी ३५ वर्षांनी एका मुलीचा जन्म झाला. ती मदनलाल यांची नात आहे. या मुलीच्या जन्माचा आनंद संपूर्ण कुटुंबाने अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुलीला ननिहालवरून हेलिकॉप्टरमध्ये घरी आणण्यात आलं. एवढेच नाही तर हेलिपॅडहून घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ग्रामस्थांनी मुलीच्या सन्मानार्थ फुलांचा वर्षाव केला. यासाठी १०-१२ दिवसांपासून तयारी सुरू झाली होती.
विशेष म्हणजे मदनलाल यांनी नातीच्या स्वागतासाठी कोणतंही काम शिल्लक ठेवलं नाही. त्यासाठी पीक विकून पाच लाख रुपये उभे केले. याच रक्कमेतून हेलिकॉप्टरचीही व्यवस्था करण्यात आली होती.
असं सांगितलं जातं आहे की, मुलीचे वडील हनुमान प्रजापत आणि पत्नी चूका देवी यांनी मुलीला हेलिकॉप्टरने घेऊन आल्या.
त्याचवेळी बुधवारी दुर्गावमीच्या निमित्ताने प्रथमच तिचा घरात प्रवेश केला. या मुलीचा जन्म तीन मार्चला तिच्या ननिहाल हर्सोलाव गावात झाला होता.
गावात आपल्या आजोबांच्या घरी पोहोचल्यानंतर 'सिद्धी' हिचं भव्य स्वागत करण्यात आले. हेलिपॅड स्थळापासून घरापर्यंत सर्वत्र फुलांनी वर्षाव केला. त्याचवेळी त्याचे बॅन्ड-बँजो लावून तिच्या कुटुंबीयांना जल्लोष साजरा केला.
माहितीनुसार, मुलगी 'सिद्धी' तिच्या आजीच्या घरी वडील हनुमान, काका अर्जुन प्रजापत, हनुमान रामाचा चुलत भाऊ प्रेम आणि राजूराम यांच्याकडे पोहोचले होते. सकाळी ९ वाजता हेलिकॉप्टरमध्ये बसून हे सर्व निंबडी चंदावता येथे आले.
त्याचप्रमाणे दुपारी २.१५ वाजता मुलगी हेलिकॉप्टरने आजोबांच्या घरी पोहोचली. जिथे या नंतर सर्व कार्यक्रम आणि स्वागत सोहळा पार पडला.