भारतातील काही फॅक्ट्स पाहून तुम्ही म्हणाल, 'Its Happen Only In India'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 04:52 PM2019-12-23T16:52:11+5:302019-12-23T17:06:36+5:30

भारत एक अद्भुत देश आहे. येथील रूढी, परंपरा आपल्याला माहीत असतीलच. मात्र, यासंबंधी काही असे फॅक्ट्स आहेत की, याबद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्हीही म्हणाल...Its Happen Only In India.

भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. याठिकाणी सर्व धर्मियांचे लोक राहतात.

मसाल्यांच्या वापरामुळे खाद्यपदार्थांना स्वाद येतोच. भारताच्या सर्व प्रांतांत मसाल्यांचा मुबलक वापर केला जातो. प्रत्येक प्रांतात पदार्थांची बदलणारी चव या मसाल्यांवरच अवलंबून असते. भारतात 70 टक्के मसाल्यांचे उत्पादन होते.

निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी विदेशी पर्यटक मोठ्याप्रमाणात भारतात येतात.

सर्वाधिक जास्त शाकाहारी लोक भारतात आहेत. याठिकाणी 60 टक्के लोक शाकाहारी आहेत, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

जगाच्या तुलनेत घटस्फोटाचे प्रमाण भारतात कमी आहे. 100 पैकी एक जोडपे घटस्फोट घेण्याबाबत विचार करत असते.