Amazing Pictures Of Life Through A Microscope
पृथ्वीवरील जीवजंतू, मनुष्य मायक्रोस्कोपमधून कसे दिसतात? हे फोटो पाहून व्हाल अवाक् By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 12:53 PM2019-12-03T12:53:01+5:302019-12-03T13:08:02+5:30Join usJoin usNext आपण आपल्या डोळ्यांनी सगळं काही बघू शकतो, असं आपल्याला वाटत असतं. पण असं अजिबात नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण थेट डोळ्यांनी बघू शकत नाहीत. मग अशा गोष्टी आपण मायक्रोस्कोपच्या मदतीने बघतो. असेच मायक्रोस्कोपच्या मदतीने काढलेले काही भन्नाट आणि अद्भूत फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे फोटो Spike Walker यांनी काढले आहेत. इंग्लंडला राहणारे Walker व्यवसायाने Photographer आणि Zoologist आहेत. त्यांना Royal Photographic Society ने यावर्षी Scientific Imaging Award ने सन्मानित करण्यात आले आहे. (Image Credit : buzzfeednews.com) एका Human Egg ला Fertilize करण्याच्या प्रयत्नात असलेले स्पर्म.... व्हिटॅमिन सी पाण्यात मिश्रित झाल्यावर असं दिसतं. हे पाण्यात राहणाऱ्या कोळीचं तोंड आहे. हा फोटो तुम्हाला ताऱ्यांचा वाटला असेल, पण हा फोटो साखरेतील क्रिस्टलचा आहे. हे जिलेटिनसोबत मिश्रित होत आहेत. ही डिझाइन नाही तर एका भोवऱ्याचं सूक्ष्म रूप आहे. मधमाश्यांवर राहणारा एक कीटक मेंदूच्या मागच्या भागात आढळणारे न्यूरॉन्स उंदराच्या भ्रूणाचा फोटो Florets ज्यांच्या मदतीने एक पूर्ण फूल तयार होतं एका मांजराच्या केसांचे Sensory Nerve Fibers. Marine Plankton चे लार्वा जे असे विचित्र दिसतात Red Valerian झाडाच्या बीया मायक्रोस्कोपमधून अशा दिसतात. पाण्यात शेवाळ वेगवेगळे होत असताना असे दिसतात पाण्यात अमीनो अॅसिडचे क्रिस्टल्स असे दिसतात. एका फुलदानीच्या पाण्यात असलेले Bacteria आणि Ciliate Protozoa. Oxidized Vitamin C चे Fractals. आपल्या धमण्यातील एक Cross-section.टॅग्स :इंटरेस्टींग फॅक्ट्सकलाव्हायरल फोटोज्सोशल व्हायरलInteresting FactsartViral PhotosSocial Viral