American woman Alice Everdeen left her job and living in bus travels earns millions of rupees.
कोट्यवधीची नोकरी सोडली, स्कूल बसमध्ये राहिली; आधीपेक्षाही डबल कमाई सुरू झाली By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 04:04 PM2024-03-14T16:04:54+5:302024-03-14T16:15:11+5:30Join usJoin usNext पैसे मिळवणं सोपे काम नाही. लोक कठोर परिश्रम करतात जेणेकरून त्यांचा पगार लक्षणीय वाढू शकेल. त्याचबरोबर अधिकाधिक कमाई व्हावी यासाठी व्यावसायिक आपला व्यवसाय दिवसरात्र वाढवण्यावर भर देतात. व्यवसाय यशस्वी होईल की नाही हे सांगणे कठीण आहे. पण चांगल्या शिक्षणाने चांगली नोकरी नक्कीच मिळवता येते. अशा परिस्थितीत बहुतेक लोक नोकरीसाठी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. पण असे काही लोक आहेत ज्यांना ऑफिसच्या कामाचा त्रास होतो. त्यामुळे ते चुकीचा निर्णय घेतात. परंतु काही लोकांसाठी असे करणे फायदेशीर असल्याचेही दिसते. आम्ही अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत जिचं नाव एलिस एव्हरडीन असं आहे. ती अमेरिकेतील ऑस्टिनमध्ये काम करायची. रिस्क घेऊन तिने नोकरीचा राजीनामा दिला. ३२ वर्षीय एलिस २०२० मध्ये अमेरिकेतील ऑस्टिन इथं एका सप्लिमेंट कंपनीत काम केले. पण ती या कामाला कंटाळली होती. तिला दर आठवड्याला ५० ते ६० तास काम करावे लागत होते. अशावेळी एके दिवशी तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने स्कूल व्हॅन विकत घेतली आणि त्यालाच आपलं घर बनवलं. आता ती संपूर्ण देशात भ्रमंती करते. या प्रवासात तिचा नवरा आणि पाळीव कुत्राही सोबत असतो. आपल्या आवडीचे आयुष्य जगणारी एलिस आता फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून १ कोटींहून अधिक कमाई करत आहे. एलिस फ्रीलांसर कंटेंट मॅनेजर म्हणून काम करते. यासाठी ती दररोज फक्त २ ते ३ तास देते. तिने सांगितले की, पूर्वी ऑफिसला जाऊन जे कमावायचे त्याच्या दुप्पट आता कमावायला सुरुवात केली आहे. एलिस ना केवळ व्हॉईस ओव्हर काम करत नाही, तर युजर जनरेटेड कंटेंट (यूजीसी) शी संबंधित व्हिडिओही बनवते. ती इतर अनेक प्रकल्पांवर काम करते. यातून तिला भरपूर पैसे मिळत आहेत आणि ती तिच्या आयुष्याचा आनंदही घेत आहे. एलिस Fiverr सारख्या नामांकित कंपन्यांसाठी फ्रीलांसिंगचे काम करते. एलिस सांगते की, टेक्सासमध्ये राहणे खूप महाग आहे. पण शाळेच्या बसमध्ये राहणे स्वस्त आहे कारण त्यांना फक्त पार्किंग आणि जेवणासाठी पैसे द्यावे लागतात. त्यांच्या म्हणण्यानुसार बस कॅम्प ग्राउंडमध्ये उभी केल्यास ३ ते ६ हजार रुपये खर्च येतो, मात्र सार्वजनिक पार्किंगमध्ये बस पार्क करणे विनामूल्य आहे. बसने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणेही स्वस्त आहे. पेट्रोलवर महिन्याला एकूण ८० हजार रुपये खर्च येतो. त्याचबरोबर त्यांना जेवणासाठी २० ते ४० हजार रुपये खर्च करावे लागतात. पण हे सर्व टेक्सासपेक्षा स्वस्त आहेत.