बाबो! नोकरीहून काढलं म्हणून त्याने चढवला बॉसच्या 4 कोटींच्या फेरारी कारवर ट्रक! By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 12:36 PM 2020-05-14T12:36:22+5:30 2020-05-14T12:52:21+5:30
असाच एक कर्मचाऱ्याला नोकरीहून काढल्यानंतर कर्मचाऱ्याने केलेला कारनामा चर्चेचा विषय ठरत आहे. यात एका बॉसला कर्मचाऱ्याला कामाहून काढणं चांगलंच महागात पडलं आहे. कर्मचाऱ्यांना नोकरीहून काढून टाकणं हे कंपनी किंवा एखाद्या बॉससाठी सर्वात कठिण काम असतं. कारण त्यांना हे माहीत की, समोरची व्यक्ती त्यावेळी कशी रिअॅक्ट करेल. रागाच्या भरात कुणी काहीही करू शकतं.
असाच एक कर्मचाऱ्याला नोकरीहून काढल्यानंतर कर्मचाऱ्याने केलेला कारनामा चर्चेचा विषय ठरत आहे. यात एका बॉसला कर्मचाऱ्याला कामाहून काढणं चांगलंच महागात पडलं आहे.
शिपींग बिझनेसमध्ये असलेल्या एका उद्योजकाने त्याच्याकडील एका ड्रायव्हरला नोकरीहून काढून टाकलं. याचाच राग मनात ठेवून त्या कर्मचाऱ्याने बॉसच्या 4.25 कोटी रूपयांच्या Ferrari GTC4Lusso या कारचा चेंदामेंदा करून टाकला.
झालं असं की, नव्यानेच कामावर ठेवलेला हा ड्रायव्हर कंपनीला अपेक्षित तसं काम करत नव्हता. जेव्हा हेच त्याला स्पष्टपणे सांगण्यात आलं तेव्हा त्याने एक व्हॉल्वो ट्रक चक्क बॉसच्या फेरारी या सुपरकारवर चढवला.
एका पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, या ड्रायव्हरला कामावर ठेवताना हे सांगण्यात आलं होतं की, त्याला 2020 ट्रक दिला जाईल. पण तो अपेक्षित काम करत नसल्याने त्याला 2020 ट्रक नाकारण्यात आला.
याने तो चांगलाच संतापला आणि त्याने ट्रक कारवर चढवला. युनायटेड टकर्स या फेसबुक पेजवर याची पोस्टही टाकण्यात आली आहे. (प्रातिनिधीक छायाचित्र)
सोशल मीडियातील या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ड्रायव्हरला नवीन 2020 सेमी ट्रक देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण त्याला तो नाकारण्यात आला. याचाच त्याला राग आला.
कंपनीच्या मालकानेही हे मान्य केले की, फेरारी त्याचीच होती. आता त्याने ड्रायव्हरला धमकावले आहे. 'माझ्या नादाला लागल्यावर काय होतं हे तुला कळेल', अशी त्याने ड्रायव्हरला धमकी दिली. ड्रायव्हरला नंतर अटक करण्यात आली. (प्रातिनिधीक छायाचित्र)
या घटनेने अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीहून काढत असलेल्या कंपन्या किंवा बॉसची चिंता वाढू शकते. अनेक कंपन्या लॉकडाऊन आणि इकॉनॉमी स्लो झाल्याने कर्मचाऱ्यांनी कमी करत आहेत.
हा काळ कुणासाठीही सोपा नाही. या घटनेही ड्रायव्हरने त्याचा सूड घेतला, पण त्याला अटक झाली. यातून चांगलं काहीच समोर आलं नाही.