Art of pages: Give Girlfriends Creative Gift
Art of leaves : गर्लफ्रेंडला द्या असे 'क्रिएटीव्ह गिफ्ट' By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 11:11 AM2018-11-20T11:11:53+5:302018-11-20T13:17:00+5:30Join usJoin usNext टाकाऊपासून टिकाऊ हे आपण नेहमीच ऐकतो, पण ज्यांच्याकडे क्रिएटीव्ह डोकं असतं तेच अशा वस्तूं निर्माण करू शकतात. सुंदर फुलांची अन् पानांची वेल घरातील अंगणात सोडण्यात आली आहे, जणू एखाद्या परीच्या साडीचा पदरच. जपानमध्ये अशीच क्रिएटीव्हीटी साकारण्यात आली आहे, झाडांच्या पानापासून सुंदर सुंदर कलाकृती तयार करण्यात आली आहे. पालापाचोळा आपण पायदळी तुडवतो किंवा कचऱ्यात टाकतो, पण थोडंस डोकं लढवल्यास अशी भन्नाट क्रिएटीव्हीटी करता येते. झाडांची वाळलेली पिवळी पाने जमिनीवर अंथरून त्यामध्ये लाला पानांनी सुंदर व मनमोहन नक्षी तयार करण्यात आली आहे. तुमच्या गर्लफ्रेंडला काही क्रिएटीव्ह किंवा भन्नाट गिफ्ट द्यायचा असल्यास तुम्ही अशा ट्रीक्स वापरू शकता. गर्लफ्रेंडचे नाव असेल किंवा तिची बर्थ डेट असेल, तुम्ही अशा क्रिएटीव्ह आयडियाने तिला शुभेच्छा देऊ शकता. घर असेलस, अंगण असेल किंवा तुमच्या आवडीचं ठिकाण असेल अशी झाडांच्या पानांची रांगोळी तुम्ही तयार करू शकता.टॅग्स :कलाजपानआयडियाartJapanIdea