Artist Kakuho Fujii creates tiniest animal sculptures
जगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का? By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 03:09 PM2018-10-15T15:09:09+5:302018-10-16T16:49:14+5:30Join usJoin usNext जपानचे प्रसिद्ध शिल्पकार काकुहो फुजी यांनी अत्यंत सुंदर सूक्ष्म शिल्पं तयार केली आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते चिकणमातीपासून कलाकुसर करून अत्यंत कल्पकतेने छोटी शिल्पं साकारत आहेत. काकुहो यांनी सर्वात प्रथम 5 मिलीमीटरचं एक शिल्प तयार केलं. त्यानंतर त्यांनी 2 मिलीमीटरचं एक सूक्ष्म शिल्प साकारलं आहे. काकुहो यांनी तयार केलेली शिल्पं पाहिल्यावर सुरुवातीला डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. काकुहो यांनी अत्यंत सुंदर अशी प्राण्यांची आणि पक्ष्यांची मनमोहक शिल्पं तयार केली आहेत. शिल्पकार काकुहो फुजी यांनी चिकणमाती आणि बारीक सुईच्या मदतीने ही किमया केली आहे. टॅग्स :जपानकलाJapanart