Attractive drawings light of artist cast zulf MYB
अंधारातून उजेडाची वाट दाखवणारे फोटो पाहून म्हणाल, वाह क्या बात है! By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 04:27 PM2020-03-04T16:27:17+5:302020-03-04T16:44:12+5:30Join usJoin usNext लंडनमध्ये राहत असलेले आर्टिस्ट जुल्फ यांनी आपल्या कलेतून अंधारातून उजेड दाखवणारे चित्र रेखाटले आहे. अतिशय समर्पक आणि आकर्षक असं हे पेंटीग आहे. या पेटींगसाठी डार्क रंगाचा पेपर वापरला जातो. त्यावर पेस्ट पेंसिल आणि कोळश्याच्या सहाय्याने चित्र रेखाटलं जातं. या पेटींग्सच्या माध्यामातून या कलाकाराला व्यक्तीचा जीवनप्रवास उलगडायचा असतो. माध्यमांशी बोलताना त्यांनी असं सांगिलतं की कला हेच माझं जीवन आहे. कोणतीही आकृती रेखाटण्याआधी ती समजून घेऊन मगचं कागदावर उतरवली जाते. त्यांना हे चित्र पूर्ण करण्यासाठी १ ते ६० तासांचा वेळ लागतो. त्यांना एकटं राहून आपल्या चित्रांसोबत वेळ घालवायला आवडतो. या कलाकारचं वय ५० वर्ष आहे आणि आपली पत्नी आणि २ मुलांसह ते लंडनला राहतात. ही कला माझ्या रक्तात आहे असं ते सांगतात. जुल्फ असं सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या कलेशी निगडीत असलेलं काम मनापासून करत असता. तेव्हा कोण काय म्हणेल याचा विचार अजिबात करू नका. तुमची स्पर्धा स्वतःशी आहे असं समजा आणि पुढे जात रहा. टॅग्स :जरा हटकेJara hatke