attractive tourist destination in the world
'ही' हटके पर्यटनस्थळ पाहिलीत का? By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 07:09 AM2018-05-29T07:09:07+5:302018-05-29T07:09:07+5:30Join usJoin usNext जेन एन टॉवर युनशान, चीन चीनमधील पर्यटन क्षेत्राला सध्या चालना मिळताना दिसतेय. या देशातील अनेक ठिकाणं पर्यटकांनी गजबजून जाताना दिसताहेत. यापैकीच एक ठिकाण म्हणजे चाय पिंग शहरातील डोंगरावर असलेलं घर. याठिकाणी पोहोचायला हजारो पायऱ्या चढाव्या लागतात. इथून तुम्हाला संपूर्ण शहर डोळ्यात साठवून घेता येतं. पोन्टे वेकियो, इटली इटलीच्या फिरेन्डे शहरातील पोन्टे वेकियो नदीवरील पूल 1345 वर्ष जुना आहे. या पुलावरील घरं आणि दुकानं पर्यटकांना आकर्षित करतात. अतिशय सुंदररित्या बांधण्यात आलेल्या या घरांना आणि दुकानांना पाहून पर्यटक आश्चर्यचकित होतात. हँगिंग मॉनेस्ट्री, चीन शांझीमधील हेंग माऊंटन चीनमधील धोकादायक डोंगरांपैकी एक आहे. या डोंगरावर लोकांनी घरं बांधली आहेत. ही घरं इतकी धोकादायक आहेत की ती जणू हवेत असल्याचा भास होतो. त्यामुळेच त्यांना हँगिंग मॉनेस्ट्री असं म्हटलं जातं. अलहजारा, येमेन येमेन हा देश उंचचउंच डोंगरांसाठी ओळखला जातो. याच डोंगरांमध्ये वसलेलं अलहजारा शहर सध्या पर्यटकांमध्ये लोकप्रिय होतंय. 12 व्या शतकात हे शहर वसवण्यात आलं. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या इमारती या भागात पाहायला मिळतात. टॅग्स :जरा हटकेJara hatke