एक्स आर्मी ऑफिसर ६ महिलांना गुलाम बनवून करत होता त्यांचं शोषण; आरोपीला अटक... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 10:36 AM 2021-03-17T10:36:50+5:30 2021-03-17T10:50:06+5:30
डेविस याने १७ वर्षे ऑस्ट्रेलियातील आर्मीत काम केलं. पोलिसांच्या कागदपत्रांनुसार, डेविसवर २०१२ ते २०१५ पर्यंत महिलांना गुलाम बनवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. ४० वर्षीय एका व्यक्तीने घरात सहा महिलांना सेक्स गुलाम म्हणून ठेवलं होतं. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. अशी माहिती समोर आली की, ही व्यक्ती आर्मीमध्ये काम करत होती. ही घटना ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्सची आहे.
ऑस्ट्रेलियातील फेडरल पोलीस जेम्स रॉबर्ट डेविसने ग्रामीण भागात बनवण्यात आलेल्या घरांमध्ये गुरूवारी छापा मारला. पोलिसांच्या हाती या घरांमधून अनेक संशयास्पद वस्तू लागल्या. तपासानंतर पोलिसांनी डेविसवर मनुष्यांना गुलाम बनवण्याचा आरोप लावला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही व्यक्तीला स्वत:ला हाउस ऑफ कॅडिफरचा प्रमुख सांगते. एका पीडित महिलेने एबीसी न्यूजला सांगितले की, डेविसने त्यांच्या गळ्यात स्टेनलेस स्टीलचा पट्टा टाकून मेटलच्या पिंजऱ्यात बंद केलं होतं.
ऑस्ट्रेलियातील पोलीस जेम्स रॉबर्टने घरांचे फोटोही जारी केले आहेत. डेविसची प्रॉपर्टी मोठ्या परिसरात आहे. त्यामुळे छापेमारी करण्यासाठी पोलिसांना १५ तासांचा वेळ लागला.
abc.net.au च्या रिपोर्टनुसार, डेविसने लाकडाची अनेक छोटी छोटी घरे तयार केली होती. ही घरे मुख्य बिल्डींग काही अंतरावर होती. यात सिंगल बेड लावण्यात आले होते.
छापेमारी केल्यावर पोलिसांना चार बॉक्स मिळालेत. ज्यांवर महिलाची नावे कोरली होती. पोलिसांना घरातून सेक्ससंबंधी काही वस्तूही सापडल्या.
डेविस याने १७ वर्षे ऑस्ट्रेलियातील आर्मीत काम केलं. पोलिसांच्या कागदपत्रांनुसार, डेविसवर २०१२ ते २०१५ पर्यंत महिलांना गुलाम बनवण्याचा आरोप लावण्यात आला आहे.
पोलिसांनुसार, आरोपीने पीडित महिलांना फसवलं आणि त्यांच्यासोबत शारीरिक, मानसिक आणि लैंगिक गैरवर्तन केलं.
पोलिसांनी असंही सांगितलं की, महिलांकडून सेक्स वर्कही केलं जात होतं. हे काम डेविसच्या इशाऱ्यावर व्हायचं. महिलांना यासाठी पैसेही दिले जात नव्हते.
पोलिसांनी सांगितले की, ज्या महिलांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना डेविसने जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांना घरातून फोन, कॉम्प्युटर ताब्यात घेतले आहेत.
डेविसने कथितपणे सेक्स गुलाम केलेल्या महिलांकडून कॉन्ट्रॅक्ट साइन करून घेतले होते. यात त्या त्यांच्या मर्जीने स्वत:ला डेविसच्या हवाली करत असल्याचं लिहिलं होतं.
पोलिसांनी सांगितले की, आतापर्यत केवळ पीडितेच्या शोषणाचा आरोप लावला आहे. आणखीही आरोप लावले जाऊ शकतात.