Baba Vanga Prediction : एलियन्सच्या हल्ल्यापासून ते सौर त्सुनामीपर्यंत; 2023 साठी बाबा वेंगा यांच्या धडकी भरवणाऱ्या भविष्यवाण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 08:45 AM2022-12-05T08:45:16+5:302022-12-05T08:50:00+5:30

बाबा वेंगा यांनी 9/11 चा दहशतवादी हल्ला आणि ब्रेक्सिट सह अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, त्या खऱ्याही ठरल्या आहेत.

बाबा वेंगा या मुळच्या बल्गेरियातील रहिवासी होत्या. लहान असतानाच त्यांना अंधत्व आले होते. बाबा वेंगा यांचे संपूर्ण जीवन बल्गेरियातील कोझुह पर्वताच्या रूपाइट भागात गेले. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला होता. त्यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तरोवा असे होते. मात्र, त्या बाबा वेंगा म्हणूनच प्रसिद्ध झाल्या.

बाबा वेंगा यांनी 9/11 चा दहशतवादी हल्ला आणि ब्रेक्सिट सह अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, त्या खऱ्याही ठरल्या आहेत. 2023 संदर्भात बोलताना त्यांनी हे वर्ष अंध:कारमय आणि संकटमय असेल अशी भविष्यवाणी ही केली आहे.

अंध:कारमय आणि संकटमय वर्ष - बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, 2023 हे वर्ष अंधःकारमय आणि संकटांनी भरलेले असेल. याच बरोबर पृथ्वीच्या कक्षेत बदलही होईल. हा बदल अणुहल्ल्यामुळेही होऊ शकतो. एढेच नाही, तर बाबा वेंगा यांनी यावर्षी भयंकर युद्ध आणि सौर त्सुनामीची भविष्यवाणीही केली आहे.

होतील लॅब बेबी, बाळाचा रंग आई-वडील ठरवतील - बाबा वेंगा यांनी त्यांच्या भविष्यवाणीत म्हटले आहे, की मुलांना जन्माला घालण्याची पारंपरीत पद्धत आता संपुष्टात येऊ शकते. तसेच, आता लॅबमध्ये तयार होणाऱ्या मुलांच्या त्वचेचा रंग आणि त्यांची शारीरिक वैशिष्ट्ये त्यांचे आई-वडीलच ठरवतील.

होऊ शकतो एलियन अॅटॅक - पृथ्वीवर दुसऱ्या ग्रहावरील शक्तींचा हल्ला होऊ शकतो. या हल्ल्यात लाखो लोक मत्यूमुखी पडतील, असेही बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीत म्हणण्यात आले आहे. विश्लेषक याचा संबंध एलियन हल्ल्यासोबत जोडत आहेत. पृथ्वीवर एलियन्सचा हल्ला होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. या हल्ल्यामुळे मोठी जीवितहानी होऊ शकते.

पॉवर प्लांटमधील स्फोटामुळे करावा लागेल गंभीर आजारांचा सामना - बाबा वेंगा यांनी त्यांच्या भविष्यवाणीत म्हणटल्याप्रमाणे, पॉवर प्लांटमधील स्फोटामुळे जग भरात विषारी ढग पसरू शकतात. यामुळे संपूर्ण आशिया खंडावर अंधःकार पसरेल. यामुळे लाखो लोकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागेल. यामुळे अनेकांचा मृत्यूही होऊ शकतो. (टीप - येथे देण्यात आलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. यासंदर्भा आम्ही कुठल्याही प्रकारची पुष्टी करत नाही.)