Bank Mistakenly Deposits 262 crore in Texas Woman’s Account
...अन् अचानकपणे 'ही' महिला झाली करोडपती; खात्यात जमा झाले तब्बल २६२ कोटी By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 08:02 PM2019-12-16T20:02:18+5:302019-12-16T20:06:11+5:30Join usJoin usNext एका बँकेने चुकून महिलेच्या खात्यावर २६२ कोटी रुपये ट्रान्सफर केले. मागील आठवड्यात या महिलेने बँक खाते चेक केले असता तिला विश्वास बसला नाही. महिलाने तिच्या पतीला याबाबत विचारणा केली. बँक खात्यात चुकीने जमा झालेली रक्कम अमेरिकेच्या टेक्सास बँकेशी निगडीत आहे. बँकेच्या एका चुकीमुळे ही ३५ वर्षीय ही महिला एक दिवसासाठी कोट्याधीश बनली. महिलेने बँकेत वाढलेली रक्कम पाहून टेक्सास बँकेशी संपर्क साधला. मात्र काही कारणास्तव संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे ही रक्कम कोणीतरी आपल्याला गिफ्ट केली असल्याचं तिच्या मनात आलं. डेली मेलच्या रिपोर्टनुसार महिलेने तिच्या पतीला ही घटना सांगितली तेव्हा त्यांना हा काहीतरी घोटाळा असल्याचं वाटलं. बँकेशी संपर्क साधल्यानंतर हा चमत्कार नव्हे तर बँकेची चुकी असल्याचं आढळलं. बँकेने सांगितले की, एका कर्मचाऱ्यांकडून अनावधानाने हे पैसे चुकीच्या खात्यात जमा केले. बँकेने याबाबत माफी मागितली अन् पैसे परत घेतले. मात्र काही वेळापुरतं का होईना या महिलेला कोट्याधीश असल्याचा भास झाला. टॅग्स :बँकपैसामहिलाbankMONEYWomen