Beautiful embroidery work on the notebook
लय भारी! वह्यांवर केलेलं सुंदर भरतकाम तुम्ही याआधी कधीही पाहिलं नसेल..... By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 04:22 PM2020-02-28T16:22:55+5:302020-02-28T16:55:38+5:30Join usJoin usNext आपण धाग्यांचा वापर सध्याच्या काळात फारसा करत नाही. सगळं काही पैसे देऊन आपल्याला मिळत असल्यामुळे वेगळा वेळ काढून आपण शिवायला बसत नाही. पण या फोटोमध्ये सुई धाग्याच्या साहाय्याने जी कलाकृती तयार केली आहे ती पाहण्यासारखी आहे. पर्यावरणास पूरक असलेल्या वह्या हाताने तयार केल्या आहेत. या वह्या रिसायकल करता येत असलेल्या मटेरीयल पासून तयार करण्यात येत आहे. वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आकारात हे भरतकाम केलेले आहे. लोकरीच्या धाग्यांचा वापर यासाठी केलेला आहे. या मुलीने एका वहीवर गर्ल पॉवर असं नाव लिहलं आहे. पानाचा आकार सुद्धा या वह्यांमध्ये आहे. या कामात खूप पर्फेक्शन दिसत आहे. अत्यंत बारकाईने हे काम केलेलं आहे. ही सुंदर कलाकृती साकारणारी मुलगी डिजायनर आहे. मार्टा असं या मुलीचं नाव आहे. टॅग्स :जरा हटकेJara hatke