हा म्हणतो मधमाश्या याचा हुकुम ऐकतात, त्याच्या संपूर्ण शरीरावर देतो आश्रय By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 07:16 PM 2021-09-05T19:16:34+5:30 2021-09-05T19:35:15+5:30
जगात अनेक चित्रविचित्र गोष्टी घडतात. तसेच अनेक चित्रविचित्र लोकही असतात. युगांडामध्येही एक अशीच व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव नदिसाबा. हा स्वत:ला मधमाशांचा राजा समजतो. याच कारणही तसंच आहे. कारण मधमाशा पोळं सोडुन याच्या अंगाला येऊन चिकटतात. का बरं? वाचा पुढे या व्यक्तीचा दावा आहे की, तो मधमाशांच्या राणीला (Queen Bee) घेऊन फक्त त्याच्याच इशाऱ्यावर संपूर्ण तिचं राज्य म्हणजे पोळं अंगावर मिरवतो. मधमाशा त्यांचं ऐकतात म्हणे...
हा माणूस मधमाशांना घाबरत नाही. चक्क खेळवतो. युगांडाच्या नदिसाबा या आदिवासी बांधवाचे फोटो सोशल मीडियावर सगळीकडे फिरत आहेत.
नदिसाबा अंगावर कपडे घालत नाही. कायम त्यांच्या अंगावर असंख्य मधमाशा चिटकलेल्या असतात. त्यांचे हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर नदिबासा प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत.
त्यांचे हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर नदिबासा प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत. या पद्धतीने हळूहळू मधमाशा या आपल्या मधपोळ्या सोडून नदिबासाच्या शरिरावर येऊन बसतात.
यूट्यूब चैनल एफ्रिमैक्स दिलेल्या माहीतीनुसार युगांडातील काही लोकांंमध्ये मधमाशांना काबुत ठेवण्याची क्षमता असते.
नदिबासा त्यातलेच एक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की शरीरावर मधमाशा पाळल्यानंतरही आजपर्यंत एकाही मधमाशीने त्याला चावलेलं नाही.
नदिसाबा हे लहानपणापासूनच मधमाशी पालन करतात. मधमाशांपासून कसा बचाव करायचा त्यांना चांगलं माहिती आहे.
कान आणि नाक झाकल्यानंतर ते डोळे आणि ओठांवर पेट्रोलियम जेली लावतात. याचमुळे मधमाशा नदिसाबाला फार इजा पोहचवत नाही.
नदिसाबाची ही कला घातक तर आहे. पण या फोटोंना सोशल मीडियावर आवडीने पाहीले जात आहे.
नदिसाबाचं स्वप्न आहे की लोकांनी मधमाशांना आश्रय द्यावा आणि जगाने या दृश्यांना आवडीने बघावं.