दिराच्या प्रेमात महिला वेडावली; पतीला सोडायला झाली तयार; 'सॉरी वहिनी' म्हणत दिर फरार By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 04:33 PM 2021-04-24T16:33:00+5:30 2021-04-24T17:03:32+5:30
काही तास तिघांचाही पोलीस स्टेशनमध्येच हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यावर प्रकरण शांत झालं. पण प्रकरणावर सोल्यूशन काहीच निघालं नाही. सामान्यपणे पती, पत्नी आणि ती अशा अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या आणि बघितल्या असतील. अशीच एक पण जरा वेगळी पती, पत्नी आणि दिराची कहाणी समोर आली आहे. (सर्व छायाचित्रे प्रातिनिधिक)
बिहारच्या दरभंगामधील ही घटना आहे. हे प्रकरण इतकं वाढलं की, तिघांनाही पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपली बाजू मांडावी लागली. तरी सुद्धा हे प्रकरण काही सोडवलं गेलं नाही. आता महिलेच्या तक्रारीवरून पोलीस तपासाला लागली आहे.
ही घटना आहे दरभंगामधील. इथे राहणाऱ्या एका तरूणीचं लग्न सहारा इंडिया गल्लीत राहणाऱ्या मो. उमेरसोबत झालं होतं. दोघांचं लग्न चार वर्षांपूर्वी झालं होतं. पण पत्नीला घरी सोडून मो. उमेर जिल्ह्यातून बाहेर मुजफ्फरपूरमध्ये राहून मुलांना शिकवण्याचं काम करतो.
त्यातून मिळणाऱ्या पैशातून तो त्याचं आणि परिवाराचं पोट भरतो. जास्तीत जास्त वेळ पती घराबाहेर राहत असल्याने महिला दीर मो. सहाबुद्दीनच्या प्रेमात पडली. त्यानंतर पतीला सोडून महिला दिरासोबत लग्न करण्याचा हट्ट करू लागली.
पोलिसांनुसार, महिलेने दिलेल्या तक्रारीत पतीकडून घटस्फोट घेण्यासोबतच दिरासोबत लग्न करण्याचाही उल्लेख केला आहे. तसेच दिरावर लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्याचा आरोपही लावला आहे.
महिलेच्या तक्रारीवरून महिला पोलीस स्टेशनने कारवाई केली. यानंतर पोलीस स्टेशनमध्ये पती, पत्नी आणि दीर सर्वांनी पोहोचून आपापली बाजू मांडली.
काही तास तिघांचाही पोलीस स्टेशनमध्येच हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यावर प्रकरण शांत झालं. पण प्रकरणावर सोल्यूशन काहीच निघालं नाही.
दरभंगाचे SDPO अनोज कुमार यांनी मीडियाला सांगितले की, महिलेचं लग्न चार वर्षापूर्वी झालं होतं. पण पती बाहेर राहून मुलांना शिकवण्याचं काम करत होता.
यादरम्यान महिला आपल्या दिराच्या प्रेमात पडली. तिने सांगितले की, तिने दिरासोबत शरीरसंबंधही ठेवले. सोबतच दिराने तिला लग्न करण्याचं आश्वासनही दिलं होतं. पण आता त्याने तसं करण्यास नकार दिला.
दुसरीकडे महिलेच्या पतीने सांगितले की, आतापर्यंत त्याने पत्नीला घटस्फोट दिलेला नाही. तर तिचं दुसरं लग्न कसं होऊ शकतं. मी तिला घटस्फोट का देऊ. आजही मी तिला माझ्यासोबत ठेवण्यास तयार आहे.
तर दीर म्हणाला की, त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. तो म्हणाला की, वहिणीच्या नात्याने आम्ही एकमेकांसोबत गंमत करत होतो. मी कधीच प्रेम असल्याचं आणि लग्नाचं आमिष दाखवलं नाही.