Birth of auspicious time? So fill 25 thousand and book Operation Theater
शुभ मुहूर्तावर हवा मुलाचा जन्म? तर 25 हजार भरा अन् ऑपरेशन थिएटर बूक करा By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 09:50 AM2019-06-14T09:50:49+5:302019-06-14T09:54:16+5:30Join usJoin usNext लग्न, वाढदिवस किंवा अन्य कोणत्या कार्यक्रमासाठी लोकं हॉटेल, हॉल बूक करताना ऐकलं असेल मात्र शुभ मुहूर्तावर मुलांना जन्म देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बुकींग केली जात आहे हे ऐकून नवल वाटेल. राजस्थानची राजधानी जयपूर येथे हे प्रत्यक्षात घडत आहे. शुभ मुहूर्तावर मुलांना जन्म देण्यासाठी जयपूरमधील मॅटरनिटी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर बूक केलं जात आहे. त्यासाठी तुम्हाला 25 हजारांपासून ते 10 हजार रुपये जास्तीचे मोजावे लागतील. मुलांचा जन्म खास दिवशी व्हावा अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. कोणत्या महिन्यात डिलिव्हरी होईल याची कल्पना डॉक्टर महिलेला आणि तिच्या घरच्यांना देतात. मात्र मुलाचा जन्मदिवस ठराविक दिवशी व्हावा असा शुभ मुहूर्त असेल तर ऑपरेशन करुन डिलिव्हरी केली जाऊ शकते. जर कोणत्याही महिलेचा पहिला मुलगा ऑपरेशनद्वारे जन्मला असेल तर दुसऱ्या मुलाच्या वेळीही 50 टक्के मुलाचा जन्म ऑपरेशनद्वारे होण्याची शक्यता असते. त्यामुळे आई-वडिलांना जो दिवस शुभ वाटत असेल अशा दिवशी मुलाचा जन्म करुन घेता येतो. त्यामुळे जयपूरच्या हॉस्पिटलमध्ये यासाठी 25 हजार रुपये जास्त दर आकारुन इच्छेनुसार महिलेला डिलिव्हरी करुन घेता येण्याची सोय दिली आहे. सामान्य वेळी ऑपरेशनला 71 हजार रुपये खर्च येतो पण शुभ मुहूर्तावर जन्म देण्यासाठी 87 हजार रुपयांचा खर्च हॉस्पिटलला भरावा लागतो. टॅग्स :हॉस्पिटलhospital