BMTC Driver Narayanappa Kept Plants In Bus And Mini Nano Lalbagh Bus Photos Viral
ही बस आहे की मिनी गार्डन? बस ड्रायव्हरचा अनोखा उपक्रम By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 10:19 AM2019-05-07T10:19:52+5:302019-05-07T10:22:35+5:30Join usJoin usNext कर्नाटकच्या एका बस ड्रायव्हरने अनोख्या पद्धतीने पर्यावरणाचं संवर्धन करत संदेश दिला आहे. सध्या सोशल मिडीयावर या बस ड्रायव्हरचा अनोखा अंदाज व्हायरल होतोय. वाढतं तापमानामुळे उष्णतेची लाट पसरली असताना पर्यावरण जपण्याचा संदेश बस ड्रायव्हर देत आहे लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी बंगळुरुच्या मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये काम करणारे ड्रायव्हर नारायणप्पा यांनी बसमध्ये छोटी छोटी झाडं लावली आहेत. त्यामुळे बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेगळाच आनंद मिळत आहे. मागील तीन-चार वर्षापासून बस ड्रायव्हर नारायणप्पा हे काम करत आहेत. लोकांमध्ये पर्यावरणबद्दल जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने मी हे काम करत आहे असं बस ड्रायव्हर नारायणप्पा यांनी सांगितले. या बसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली आहे. त्यामुळे बसला मिनी गार्डनचं स्वरुप आलं आहे. नारायणप्पा यांनी सुरु केलेला हा उपक्रम पर्यावरणवादी कार्यकर्त्यांसाठी कौतुकाचा विषय बनलेला आहे. रोज सकाळी 6 वाजता नारायणप्पा बस डेपोमध्ये जाऊन बसमध्ये लावण्यात आलेल्या झाडांना पाणी घालण्याचं काम करतात. नारायणप्पा यांच्यामुळे बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून एक सुखद प्रवासाचा अनुभव प्रवाशांना मिळत असल्याचं सांगण्यात येतं. टॅग्स :बसचालकवातावरणBus Driverenvironment