The Bookstore Who Started Bookface Optical Illusion Viral on social media
चेहऱ्यावर पुस्तक की पुस्तकावर चेहरा; भन्नाट कल्पनेनं बदलला दुकानाचा चेहरामोहरा By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 03:39 PM2019-05-27T15:39:42+5:302019-05-27T15:47:42+5:30Join usJoin usNext इंटरनेट आणि सोशल मीडियानं पुस्तक संस्कृती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा कायम होत असते. त्यामुळेच लायब्ररी मोलाट या फ्रान्समधील पुस्तक दुकानानं भन्नाट शक्कल लढवली. आपल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर पुस्तक ठेवून कर्मचाऱ्याचा आणि पुस्तकाचा चेहरा अनोख्या पद्धतीनं टिपण्याचा नवा प्रयोग लायब्ररी मोलाटनं केला. लायब्ररी मोलाटच्या #बुकफेस कॅम्पेनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ज्या सोशल मीडियामुळे लोकांचं पुस्तकांच्या दुकानांकडे दुर्लक्ष झालं, त्याच सोशल मीडियाचा आधार घेत लायब्ररी मोलाटनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं. लायब्ररी मोलाटच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्तमपणे #बुकफेस कॅम्पेन राबवलं आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चेहऱ्याशी जुळणारी हेअर स्टाइल, तंतोतंत जुळणारे चेहऱ्यावरील भाव यामुळे हे फोटोशूट अगदी हटके झालं आहे. लायब्ररी मोलाटच्या या भन्नाट फोटोंमुळे सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या वाढली आहे. टॅग्स :जरा हटकेJara hatke