७०० वर्षांआधीची अशी भयावह घटना, ज्यात निर्दयीपणे घेतला गेला १० लाख लोकांचा जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 03:08 PM2020-03-09T15:08:11+5:302020-03-09T15:31:28+5:30

काही पुस्तकांमध्ये लिहिण्यात आले आहे की, बगदादच्या गल्ल्या त्यावेळी मृतदेहांनी बंद झाल्या होत्या.

इतिहासाची पाने उलगडल्यावर काही अशा घटना समोर येतात ज्या वाचून आजही अंगावर शहारे येतात. अशीच एक घटना ज्यात १० लाखांपेक्षा जास्त लोकांना निर्दयीपणे मारण्यात आलं होतं. १३ फेब्रुवारी १२५४ ला इराकची राजधानी बगदादमध्ये नरसंहार सुरू होता.

हा नरसंहार मंगोल शासक चंगेज खानचा नातू हलाकू खानने केला होता. ही घटना इतिहासातील सर्वात क्रूर घटना मानली जाते. त्यावेळी बगदाद इस्लामचं सर्वात शक्तीशाली केंद्र मानलं जात होतं. जे मंगोल शासकांनी उद्धस्त केलं होतं. (Image Credit : illustratedcuriosity.com)

हलाकू खानने यावेळी किती लोकांना मारलं याचा अंदाज लावणं कठिण आहे. पण इतिहासकारांनुसार, यात दोन लाख ते १० लाख लोकांना निर्दयीपणे तलवार, बाण आणि भाल्यांनी मारण्यात आलं होतं. (Image Credit : thegreatcoursesdaily.com)

काही पुस्तकांमध्ये लिहिण्यात आले आहे की, बगदादच्या गल्ल्या त्यावेळी मृतदेहांनी बंद झाल्या होत्या. त्या मृतदेहांमधून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा हलाकू खानला शहराबाहेर टेन्ट बांधून रहावं लागलं होतं. (Image Credit : independentphilosophy.net)

नोव्हेंबर १२५४ मध्ये हलाकूच्या मंगोल सेनेने बगदादकडे चाल केली, जिथे खलीफा राज्य करत होता. तिथे गेल्यावर हलाकूने सेना पूर्व आणि पश्चिम भागात विभागली जेणेकरून तेथून वाहणाऱ्या दजला नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर आक्रमण करता येईल. (Image Credit : Social Media)

खलीफाला आधी आत्मसमर्पण करण्याचा इशारा देण्यात आला होता. पण त्याने नकार दिला. अशात मंगोल सेनेने त्यांच्यावर हल्ला चढवला. खलीफाला पराभवाचा सामना करावा लागला. (Image Credit : Social Media)

या घटनेला ७०० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला, पण आजही इतिहासाचं हे पान सर्वात जास्त भयावह पानांपैकी एक आहे.

तसेच तेथील पुस्तकालये, महाल, मशीदी आणि इमारती जाळल्या. असे म्हणतात की, पुस्तकांच्या वाहत्या शाईमुळे दजला नदीचं पाणी काळं झालं होतं. (Image Credit : YouTube)

असे म्हणतात की, बगदादच्या खलीफाला तर मंगोल सैनिकांनी फार वाईट मरण दिलं. त्याला एका चटईमध्ये लपेटलं गेलं आणि त्याच्यावरून घोडे सोडण्यात आले. (Image Credit : en.wikipedia.org)

जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत हे असंच चाललं. प्रसिद्ध संशोधक मार्को पोलोनुसार, खलीफाला उपाशी ठेवून मारण्यात आलं.

असे सांगितले जाते की, हलाकू खानच्या आक्रमणाआधी इराणमध्ये सगळेच विद्वान अरबी भाषेत लिहित होते. बगदादची ताकद नष्ट झाल्यावर इराणमध्ये फारसी भाषा पुन्हा वाढू लागली आणि त्यावेळचे इराणमधील विद्वान-इतिहासकारही फारसीमध्ये लिहू लागले होते. (Image Credit : YouTube)

बगदादवर हलाकू खानने आक्रमण केल्यावर भारतावरही प्रभाव पडला होता. बरेच इराणी, अफगाण आणि तुर्क विद्वान, शिल्पकार भारतात दिल्लीत येऊन वसले होते.

या घटनेला ७०० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला, पण आजही इतिहासाचं हे पान सर्वात जास्त भयावह पानांपैकी एक आहे.