Bunch of red grapes Ruby Roman sold for Rs 75 lakh at Japanese auction
बापरे! 24 लाल द्राक्षांचा गुच्छ विकला 7.5 लाख रुपयांना... By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 02:50 PM2019-07-12T14:50:48+5:302019-07-12T14:58:30+5:30Join usJoin usNext जपानमध्ये 24 लाल द्राक्षांचा एक गुच्छाची किंमत जवळपास 7.5 लाख रुपये इतकी झाली आहे. खास जातीच्या या एका द्राक्षाचे वजन 20 ग्रॅम असते. येथील सरकारने 12 वर्षांपूर्वी इशिकावा प्रांतात या जातीचे द्राक्षे विकसीत केले होते. खासकरुन, ही द्राक्षे श्रीमंतांची फळे म्हणून ओळखली जातात. जपानमध्ये या द्राक्षांना रुबी रोमन नावाने ओळखतात. ही द्राक्षे गोड आणि रसरशीत असतात. पण, थोडी एसिडिक सुद्धा आहेत. लग्झरी फळांच्या यादीत रुबी रोमन समावेश आहे. त्यामुळे विशेषकरुन शुभ कार्यासाठी किंवा बिझिनेस प्रमोशनदरम्यान गिफ्ट दिली जातात. लिलाव करणाऱ्या एका अधिकाऱ्यांने सांगितले की, बाजारात या रूबी रोमन द्राक्षांची मागणी मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे या द्राक्षांना मोठी किंमत आहे. कनाजावा बाजारात या द्राक्षावर रिकॉर्ड ब्रेक बोली लावण्यात आली. 24 लाल द्राक्षांचा हा गुच्छ 'ह्याकुराकुसो' नावाच्या एका कंपनीने खरेदी केला आहे, असेही त्यांनी सांगितले. टॅग्स :फळेfruits