विश्वास बसणार नाही, काही गूढांची निर्मिती कशी झाली? भूगर्भीय रचनांचे शास्त्रज्ञांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 12:58 AM2020-01-12T00:58:47+5:302020-01-12T01:01:27+5:30

हिलियर तलाव /ऑस्ट्रेलिया : पश्चिम ऑस्ट्रेलियापासून दूर असलेल्या बेटावरील हा छोटासा खारट पाण्याचा तलाव आहे. गुलाबी रंगाच्या पाण्यामुळे तो नवल बनला आहे.

सहारा नेत्र / मॉरिटानिया : पश्चिम आफ्रिकन देशातील मॉरीटानिया येथील २८ मैल लांबीची समकेंद्री विशाल रिंगण हे एक गूढ आहे. याबाबत असलेले कुतूहल आजही लोकांमध्ये कायम आहे.

परिमंडले /नामीबिया : नामिबियाच्या रखरखीत वाळवंटातील परिमंडले म्हणजे गोलाकार खड्डे आहेत. भूमीतील लाल माती त्यातून चमकताना दिसते. या परिमंडलांभोवती गोलाकार गवत वाढलेले असते.

नस्तापोका आर्क / कॅनडा : कॅनडाच्या हडसन नदीच्या आग्नेय कोपऱ्यात जवळच एक अर्धवर्तुळाकार खडक आहे. हडसन बे आर्क म्हणून प्रसिद्ध असणारे हे रहस्यमय विवर उल्कापातामुळे निर्माण झाले असल्याचे मानले गेले.

ग्रेट अनकॉन्फोरिटी /अमेरिका : सुमारे १.२ अब्ज ते २५० दशलक्ष वर्षांपूर्वी संपूर्ण जगातील पृथ्वीच्या काही भागांमधून काही विशाल खडक पूर्णपणे गहाळ झाले. खडकाचा हा गहाळ झालेला प्रचंड हिस्सा अ‍ॅरिझोनामधील ग्रँड कॅनियन येथे स्पष्टपणे दिसून येतो.

यमाल क्रेटर्स / रशिया : २०१४ मध्ये, सायबेरियातील यमाल द्वीपकल्पाजवळ समुद्रात जाणाºया हिमनगात एक प्रचंड विवर दिसले. ते १०० फूट रुंद आहे.

टॅग्स :पृथ्वीEarth