सेलिब्रिटी प्रेग्नन्सीतून कमावतात कोट्यावधी रूपये, जाणून घ्या कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 03:45 PM2021-01-25T15:45:49+5:302021-01-25T15:57:42+5:30

आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा अनेक कंपन्या आहेत ज्या सेलिब्रिटींना प्रेग्नन्सी दरम्यान आपल्या प्रॉडक्टची ब्रॅंडींग आणि प्रमोशन करण्यासाठी संपर्क करतात.

आजकाल लोकांना त्यांच्या फेवरेट सेलिब्रिटींच्या लाइफमध्ये काय सुरू आहे हे जाणून घ्यायचं असतं. सेलिब्रिटी कधी लग्न करणार आहेत. त्यांना बाळ कधी होणार आहे. त्याच नाव काय ठेवणार आहेत. पण हा ट्रेन्ड अलिकडे वाढला आहे. याआधी सेलिब्रिटी प्रेग्नेन्सीबाबत कधी इतकी चर्चा होत नव्हती. आज सेलिब्रिटी प्रेग्नेन्सी एका मोठा बिझनेस झाला आहे. कोट्यावधी रूपयांचा व्यापार होतो. ब्रॅंडींग, सोशल मीडिया प्रमोशन होतं. चला जाणून घेऊ सेलिब्रिटी प्रेग्नन्सी हा बिझनेस किती मोठा आहे. (Image Credit : Getty Image)

आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा अनेक कंपन्या आहेत ज्या सेलिब्रिटींना प्रेग्नन्सी दरम्यान आपल्या प्रॉडक्टची ब्रॅंडींग आणि प्रमोशन करण्यासाठी संपर्क करतात. त्यांचं सोशल मीडिया हॅंडल करण्यासाठीही वेगळी कंपनी जुळली जाते. प्रग्नन्सीची घोषणा करण्यासाठीही स्पॉन्सरशिप मिळते. मेडिकल प्रॉडक्ट तयार करणाऱ्या एका कंपनीने २०१३ पासून आतापर्यंत ७० पेक्षा जास्त सेलिब्रिटीज आणि सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्ससोबत एंडोर्समेंट केली आहे.

तुम्हाला माहीत आहे का की, हा बिझनेस कधीपासून वाढला? गायिका केलिस रोजर्सन आणि बॉलरूम डान्सर करिना स्मर्नऑफने आपल्या प्रेग्नन्सीचा घोषणा ब्रॅंन्ड प्रमोशन आणि एंडोर्समेंटसोबत केली होती. अशा स्टार्सच्या प्रेग्नन्सीसाठी कंपनीज गर्भधारणेपासून ते डिलीवरीपर्यंत सर्वच प्रॉडक्टचं ब्रॅंडींग करतात. यासाठी सेलिब्रिटीज चांगलं मानधन मिळतं. काही सेलिब्रिटीज तर ७ कोटी रूपये इतकंही मानधन घेतात. (Image Credit : Getty Images)

सेलिब्रिटी ऑड्रिना पॅट्रिजने २०१५ मध्ये ट्विटरवर तिच्या प्रेग्नन्सीची बातमी फॅन्सना दिली होती. यात ती एका प्रेग्नन्सी टेस्ट करणाऱ्या कंपनीचा ब्रॅन्ड एंडोर्समेंट करताना दिसली होती. तिने तिच्या ट्विटरवर लिहिलं होतं की, बेबी ऑन द वे आहे आणि याची प्रेग्नन्सी टेस्ट करणाऱ्या कंपनीच्या प्रॉडक्टने कन्फर्म केलं आहे. पॅट्रिज नंतर म्हणाली की, यात लपवण्यासारखं काहीच नाही. (Image Credit : Getty Images)

२०१९ मध्ये ब्रिटीश मॉडल इस्करा लॉरेंसने सुद्धा बॉयफ्रेन्डसोबत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला होता. तिलाही प्रेग्नन्सी टेस्ट कीट तयार करणाऱ्या कंपनीने पैसे दिले होते. त्यातील तिने २० हजार डॉलर म्हणजे १४.५९ लाख रूपये दान केले होते. जेणेकरून गर्भधारणेत ज्यांना अडचणी येत आहेत त्यांना मेडिकल मदत मिळावी. (Image Credit : Getty Images)

Socialyte नावाची एक ब्रोकर कंपनी आहे जी सेलिब्रिटी प्रेग्नन्सीचा एंडोर्समेंट बिझनेस करते. या कंपनीची वाइस प्रेसिटेंड साराह बॉयड म्हणाली की, सेलिब्रिटी प्रेग्नन्सीचा बिझनेस फार मोठाआ आहे. यात सेलिब्रिटींचं मानधन त्यांच्या लोकप्रियतेनुसार ठरवलं जातं. अनेकदा सेलिब्रिटी स्वत:ही या गोष्टींसाटी पेमेंट करतात. साहार म्हणाली की, कायली जेनरला प्रेग्नन्सी एंडोर्समेंटसाठी १ मिलियन डॉलर म्हणजे ७.२९ कोटी रूपयांची मागणी करू शकते. (Image Credit : Getty Images)

ड्रेक यूनिव्हर्सिटीमध्ये लॉ, पॉलिटिक्स आमि सोसायटीच्या प्रोफेसर रिनी क्रेमर सांगतात की, ब्रॅंड पार्टनरशिप आजकाल मातृत्वाला प्रोत्साहन देतात. पण याला पैशाने जोडून पाहिलं जातं. पण यात काहीच चूक नाही. अशाप्रकारच्या पार्टनरशिपमध्ये सेलिब्रिटीज सामान्य महिलांना सांगतात की, त्यांची प्रेग्नन्सी कशी होती. टेस्ट करण्यासाठी कोणत्या कंपनीचं प्रॉडक्ट चांगलं आहे. कोणते डायपर्स चांगले आहेत. हे एकप्रकारचं जागरूकता अभियान आहे.

निकोल पेलिज्जी म्हणजे स्नूकी नावाच्या फेमस सेलिब्रिटी टीव्ही स्टारने २०१२ मध्ये पीपुल मॅगझीनच्या कव्हर पेजवर तिचा प्रग्नन्सीचा फोटो प्रकाशित केला होता. स्नूकी म्हणाली होती की, त्यावेळी ही मोठी डील होती. लोकांना जाणून घ्यायचं होतं की, मी त्यांची इच्छा पूर्ण केली. (Image Credit : Getty Images)

याचप्रमाणे हॉलिवूड अभिनेत्री डॅनिएल ब्रुक्सनेही सुद्धा आपल्या प्रेग्नन्सीला ब्रॅंड पार्टनरशिपमध्ये बदललं होतं. तिने एका कंपनीसोबत डील केलं होतं. यासाठी डॅनिएल म्हणाली होती की, हे मी माझ्या परिवाराच्या चांगल्यासाठी केलं. यात काहीच चुकीचं नाही. (Image Credit : Getty Images)

सध्या बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खानची दुसरी प्रेग्नन्सी चांगलीच चर्चेत आहे. पहिल्यावेळीही चांगलीच चर्चा झाली होती. आता दुसऱ्यांदा प्रेग्नन्सी दरम्यान तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केलं. पण तिने एखाद्या कंपनीसोबत डील केलं की नाही हे मात्र अधिकृतपणे सजलेलं नाही.