भारतातील निसर्ग सौंदर्याने नटलेली काही ठिकाणं, पर्यटकांना नक्कीच खुणावतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 09:50 PM2020-03-07T21:50:09+5:302020-03-07T22:13:55+5:30

भारत विविधतेने नटलेला आहे असून हा खेड्यापाड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतातील काही याठिकाणे निसर्गसौंदर्याने नटलेली आहे. अशाच काही भारतातील ठिकाणे खालील प्रमाणे...

मावल्यान्नांग, मेघालय - मेघालयमधील मावल्यान्नांग हे स्वच्छ आणि सुंदर गाव आहे. 2003 साली या गावाला आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून गौरविण्यात आले होते.

खोनोमा, नागालँड - नागालँडमधील खोनोमा या गावाला भारतातील सर्वाधिक हिरवळ असलेले गाव म्हणून ओळखले जाते.

किल्ला रायपूर, लुधियाना - या गावामध्ये पंजाबमधील संस्कृतीचे दर्शन होते. येथे ग्रामीण ऑलिम्पिकचेही आयोजन होते.

मलाना, हिमाचल प्रदेश - हिमाचल प्रदेशातील या गावामध्ये गेल्यावर निसर्गाच्या अधिक जवळ गेल्याचा भास होतो.

कसौल, हिमाचल प्रदेश - हिमाचल प्रदेशमधील घनदाट जंगलात वसलेल्या या गावामध्ये तुम्ही कमी खर्चात सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.

गोकर्ण, कर्नाटक - येथील समुद्र किनारा फार सुंदर आहे. तसेच हे एक तीर्थक्षेत्र देखील आहे.

मिरिक, पश्चिम बंगाल - हे गाव पर्यटनाच्या नकाशावर आलेले नाही. पण येथील तलाव सुंदर आहे.

कटारमल, उत्तराखंड - उत्तराखंडमधील कटारमल येथे काही प्राचीन मंदिरे आहेत.

भंडारदरा, महाराष्ट्र - महाराष्ट्रातील भंडारदरा हे सुद्धा एक सुंदर पर्यटन केंद्र आहे.