55 सेंकदाच्या 'या' व्हिडिओमध्ये असे काय आहे, जो 5 कोटींना विकला?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 03:06 PM2021-05-24T15:06:58+5:302021-05-24T15:26:38+5:30

'charlie bit my finger' : अमेरिकेत राहणारे आयटी कंपनीचे मॅनेजर हॉवर्ड डेविस-कैर यांनी मे 2007 मध्ये 55 सेकंदाचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला होता.

YouTube वर 55 सेकंदाच्या एका व्हिडिओने धूमाकूळ घातला आहे. ज्यामुळे एका कुटुंबाचे नशीबच बदलले. दोन मुलांचा हा व्हिडिओ लोकांना इतका आवडला आहे की, त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

व्हिडिओचा लिलाव एनएफटीद्वारे करण्यात आला, ज्याची अंतिम बोली पाच कोटी लावण्यात आली आहे. वेबसाइट मेल ऑनलाइनच्या माहितीनुसार, अमेरिकेत राहणारे आयटी कंपनीचे मॅनेजर हॉवर्ड डेविस-कैर यांनी मे 2007 मध्ये 55 सेकंदाचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला होता.

या व्हिडिओमध्ये दिसणारी दोन मुले हॅरी आणि चॉर्ली यांचे वय त्यावेळी अनुक्रमे तीन आणि एक वर्ष होते. या व्हिडिओमध्ये हॅरी आणि चार्ली एकत्र खुर्चीवर बसले होते. त्यावेळी चार्लीने हॅरीच्या बोटाचा चावा घेतला.

जेव्हा हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला. तेव्हा मला असे वाटले की, हा व्हिडिओ थोडासा मजेशीर आहे. याशिवाय दुसरे काही नाही, असे हॉवर्ड यांनी सांगितले. तसेच, या व्हिडिओला 'चार्ली बिट माय बोट' असे नाव देण्यात आले.

काही महिन्यांनंतर, हा व्हिडिओ हटविण्यासाठी पाहिले, त्यावेळी हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला असल्याचे दिसून आले. हॉवर्ड म्हणाले की, 'मला हा प्रश्न देखील पडला की लोक इतका हा व्हिडिओ का पाहत आहेत, परंतु या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.'

या व्हिडीओने या दोन भावंडांना इंटरनेट विश्वात जगातील हिरो बनविले. तर कुटुंबीयांनाही भरमसाट उत्पन्न मिळू लागले.' या व्हिडिओला बर्‍याच जाहिराती मिळाल्या, ज्यामुळे कथितरित्या गेल्या वर्षांमध्ये लाखोंची कमाई झाली. यानंतर या व्हिडिओचा पुन्हा एकदा 'अपूरणीय टोकन' (एनएफटी) म्हणून लिलाव करण्यात आला, ज्यामध्ये पाच कोटींची बोली लागली.

यूट्यूबवर पोस्ट केलेला हा व्हिडिओ जवळपास 883 मिलियन वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ सर्वाधिक जास्त पाहिलेल्या व्हिडिओपैंकी एक आहे. 2007 मध्ये अपलोड केलेल्या या व्हिडिओमध्ये दिसणारी मुले आता मोठी झाली आहेत.

हॅरी 6 फूट उंचीचा झाला आहे. ए-लेव्हलचा विद्यार्थी आहे. पंधरा वर्षाचा चार्लीही अभ्यास करत आहे. या व्हिडिओची माहिती शेअर करताना हॉवर्ड यांनी सांगितले की, जेव्हा हा व्हिडिओ बनला होता तेव्हा हा व्हिडिओ आजी-आजोबांना पाठवायचा होता.

ईमेलद्वारे पाठविण्यासाठी या व्हिडिओची साइज मोठी होती. त्यामुळे हा व्हिडिओ खाजगी YouTube अकाऊंटवर अपलोड करण्यात आला. या व्हिडिओला अधिक सहजतेने एक्सेस करता यावा, यासाठी तो सार्वजनिक करण्यात आला होता. ( फोटो-Howard Davies-Carr)