Shocking! सूप बनवण्यासाठी कापला होता कोब्रा, २० मिनिटांनंतर फण्याने मारला दंश; शेफचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 12:00 PM2021-08-25T12:00:26+5:302021-08-25T12:08:48+5:30

दरम्यान काही देशांमध्ये असं मानलं जातं की सापाचं मांस खाल्ल्याने अनेक फायदे होतात. ज्यामुळे सापांच्या काही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. चीनमध्ये इंडोचायनिज स्पिटिंग कोब्राची शिकार होते.

सापाच्या दंशाने मनुष्याचा मृत्यू होणं सामान्य बाब आहे. पण दक्षिण चीनमध्ये अशी घटना घडली ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. इथे एका रेस्टॉरन्टमध्ये शेफने कोब्रा सापाचं तोडं कापून बाजूला ठेवलं होतं. त्यानंतर शेफ सापाचं सूप करण्याची तयारी करत होती. साधारण २० मिनिटांनंतंर कोब्रा सापाच्या कापलेला फणा फेकण्यासाठी शेफ तो उचलला तर त्याला जोरदार झटका बसला. कापलेल्या फण्याने शेफला दंश मारला. ज्यामुळे शेफचा मृत्यू झाला.

चीनच्या ग्वांगडोंग प्रांताच्या फोशान शहरात राहणारा शेफ पेंग फॅन इंडोचायनिज स्पिटिंग कोब्रा सापाच्या मांसाने सूप तयार करत होता. तेव्हाच त्याला सापाच्या कापलेल्या फण्याने दंश मारला. चीनमध्ये कोब्रा सापाचं सूप फार आवडीने प्यायलं जातं.

शेफ पेंगने कोब्रा सापाचं मुंडकं कापल्यावर सूप बनवायला २० मिनिटांचा वेळ लागला. त्यानंतर शेफ टेबलची साफ करत होता. काही वेळाने शेफने सापचं कापलेलं मुंडकं फेकण्यासाठी ते हातात घेतलं. तेव्हाच सापाच्या कापलेल्या मुंडक्याने दंश मारला.

रेस्टॉरन्टमधील ग्राहक ४४ वर्षीय लिन सन म्हणाले की, 'मी माझ्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त रेस्टॉरन्टमध्ये जेवण करत होतो. तेव्हा अचानक गोंधळ झाला. आम्हाला माहीत नव्हतं की, नेमकं काय झालं. पण किचनमधून आरडा-ओरड ऐकायला येत होती'.

ते म्हणाले की, नंतर समजलं की, एका शेफला सापाने दंश मारला. तिथे सगळी धावपळ सुरू होती. डॉक्टरांना फोन करण्यात आला. पण डॉक्टर पोहोचेपर्यंत शेफचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी सांगितलं की, 'ही एक फार असामान्य घटना आहे. हा केवळ एक अपघात आहे. शेफला वाचण्यासाठी काहीच केलं जाऊ शकत नव्हतं. केवळ डॉक्टरच त्याची मदत करू शकले असते'.

याबाबत वैज्ञानिक म्हणाले की सापसारखे जीव मृत्यूनंतरही एक तासापर्यंत हालचाल करू शकतात. कोब्राचं विष विशेषकरून जास्त घातक असतं. यात न्यूरोटॉक्सिन असतं. जे ३० मिनिटात व्यक्तीचा जीव घेऊ शकतं किंवा व्यक्तीला अपंग करू शकतं.

दरम्यान काही देशांमध्ये असं मानलं जातं की सापाचं मांस खाल्ल्याने अनेक फायदे होतात. ज्यामुळे सापांच्या काही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. चीनमध्ये इंडोचायनिज स्पिटिंग कोब्राची शिकार होते.