अरे बाप रे बाप! तुमच्या केसांमधून चीन करत असलेली कमाई वाचून चक्रावून जाल, केसांची केली जाते तस्करी! By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 11:53 AM 2021-04-08T11:53:07+5:30 2021-04-08T12:04:54+5:30
म्यानमार सीमेवर नेहमीच सोन्याच्या किंवा जंगली जनावरांच्या तस्करीच्या बातम्या समोर येत असतात. मात्र, आसाम रायफलने दोन महिन्यांपूर्वी मानवी केसांनी भरलेल्या १२० पोत्यांसोबत तस्करांना पकडलं होतं. नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. इतकंच काय तर यावरून आंध्र प्रदेशातील राजकारणही तापलं. म्यानमार सीमा सुरक्षा दलाने दोन महिन्यांपूर्वी तिरूपती मंदिरातील भाविकांनी अर्पण केलेल्या केसांच्या खेपेची तस्करी करत असलेल्यांना अटक केली. हा मुद्दा भावनांशी जुळलेला होता. त्यामुळे प्रतिक्रिया येणं सहाजिक होतं. मिळालेल्या माहितीनुसार, तस्करी केल्या जाणाऱ्या या केसांची किंमत साधारण १.८ कोटी रूपये होती. हे केस चीनला पाठवले जात होते.
म्यानमार सीमेवर नेहमीच सोन्याच्या किंवा जंगली जनावरांच्या तस्करीच्या बातम्या समोर येत असतात. मात्र, आसाम रायफलने दोन महिन्यांपूर्वी मानवी केसांनी भरलेल्या १२० पोत्यांसोबत तस्करांना पकडलं होतं.
२० मार्चला आसाम रायफल्सने याबाबत माहिती दिली. अशा बातम्या समोर आल्या की, लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, चीन या केसांचं करतो काय? यातून चीनची किती कमाई होते? केसांचा बाजार किती मोठा आहे? चला जाणून घेऊ या प्रश्नांची उत्तरे..
चीनच्या हेनान प्रांतातील जुचांग शहर, ज्याला सिटी ऑफ हेअरपीस असंही म्हटलं जातं. चीनच्या सॅनलियान लाइफ वीक मॅगझिननुसार, येथून दर दोन सेकंदाने एक विग तयार करून कोणत्या ना कोणत्या देशात विकला जातो.
यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, चीनमध्ये विग तयार करण्या बिझनेस किती मोठा आहे. जगात सर्वात जास्त विग चीनच्या याच शहरात तयार केले जातात.
असे सांगितले जाते की इथे १०० वर्षापेक्षाही जास्त काळापासून विग तयार करण्याचा बिझनेस सुरू आहे. एका अंदाजानुसार, २०१७ मध्ये २४० कंपन्या आणि ३ लाखांपेक्षा जास्त लोक यात काम करतात.
जगभरात विगचा जेवढं मार्केट आहे त्यातील ७० टक्के मार्केटवर चीनचा कब्जा आहे. ते जगभरात विग सप्लाय करतात. चीनचा विगचा बिझनेस चार भागांमध्ये विभागला जाऊ शकतो. विगसाठी कच्चा माल, मनुष्यांच्या केसांपासून तयार विग, केमिकल फायबर विग आणि दुसरी वस्तूंपासून तयार विग.
जगभरात नकली केस किंवा विगची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. जागतिक मागणीाबाबत सांगायचं तर एकट्या नॉर्थ अमेरिकेत ६२ टक्के विगची मागणी आहे. त्यासोबतच आफ्रिका आणि यूरोपिय देशांमध्येही याची मोठी मागणी आहे.
एका रिपोर्टनुसार, २०१९ मध्ये चीनने ६७.०८ हजार टन विगची निर्यात केली. बाजारातील याच्या किंमतीबाबत सांगायचं तर चीनने ३.५९ बिलियन डॉलर म्हणजे साधारण २६.७ हजार कोटी रूपयांची निर्यात केली. कोरोनामुळे ही निर्यात कमी झाली. पण विगची किंमत वाढवली आहे.
जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी चीन स्वस्त भावात मनुष्यांचे केस खरेदी करण्याच्या प्रयत्नात असतो. यासाठी बरेच गॅंग सक्रिय आहेत. या गॅंग भारत, पाकिस्तान आणि म्यानमार मार्गे केसांची तस्करी करतात. भारतातून सामान्यपणे मंदिरात अर्पण केलेल्या केसांची तस्करी होते.
यामागचं कारण हे आहे की, या केसांची लांबी चांगली असते. ज्याचे चांगले पैसे मिळतात. एक किलो १० इंच लांब केस २२० युआन म्हणजे साधारण २५०० रूपयात खरेदी करून ते चीनमध्ये साधारण १० हजार रूपयात विकले जातात.