चीनमध्ये आहे जगातली सर्वात वेगवान ट्रेन, वेग पाहुन थक्क व्हाल...अक्षरश: हवेत तरंगते

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 05:58 PM2021-09-29T17:58:55+5:302021-09-29T18:29:38+5:30

चीनमध्ये एक अशी ट्रेन आहे जी धावताना अक्षरश: हवेत तरंगताना दिसते. या ट्रेनचा वेग इतका आहे की काहींच्या मते हे जगातलं सर्वात वेगवान वाहन आहे. या ट्रेनची आणखी वैशिष्ट्य जाणून घेऊया...

पृथ्वीवर जर कोणते वेगवान वाहन (World's Fastest Train) असेल तर ते चीनची मॅग्लेव्ह ट्रेन आहे, असे काहींचे मत आहे.

२० जुलै २०२१ रोजी चीनच्या किनारपट्टीवरील शिंगॉन्ग प्रांताच्या किंगदाओ येथे सार्वजनिकपणे हाय-स्पीड मॅग्लेव्ह ट्रेनची सेवा सुरू करण्यात आली.

चिनी मीडियाच्या वृत्तानुसार, ही ६०० किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. मॅगलेव्ह ट्रेन धावताना रुळावर थोडीशी तरंगताना दिसते

मॅग्लेव्ह ट्रेनला १० डबे जोडले जाऊ शकतात. या प्रत्येक कोचमध्ये १०० प्रवाशांची क्षमता असते.

ही ट्रेन विद्युत चुंबकीय शक्तीच्या (Electro Magnetic Force) मदतीने रुळाच्या वर तरंगताना दिसते. या ट्रेनला 'फ्लोटिंग ट्रेन' असेही म्हटले जाते.

या ट्रेनचा प्रोटोटाइप २०१९ मध्ये बनवण्यात आला होता. त्याची यशस्वी चाचणी जून, २०२० मध्ये झाली.

या ट्रेनचा वेग ताशी 600 किलोमीटर आहे. त्यानुसार शांघाई ते बीजिंगपर्यंत जाण्यास अडीच तास लागतील. शांघाई ते बीजिंगचे अंतर एक हजार किलोमीटरहून अधिक आहे. त्या तुलनेत, विमानाने या प्रवासासाठी ३ तास आणि हाय स्पीड रेल्वेने साडेपाच तास लागतील.

चीनच्या किनारपट्टीवरील शहर किंगदाओ येथे ही ट्रेन तयार करण्यात आली आहे. मॅगलेव्ह ट्रेन चीनने स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केल्याचा दावा केलाय.

शांघाईमध्ये मॅगलेव्ह ट्रेनसाठी छोटी लाईन आहे, जी शहरातून मुख्य विमानतळावर जाते.

चीनकडे अद्याप आंतरराज्य किंवा आंतरराज्यीय मॅगलेव्ह लाईन तयार केलेली नाही. शांघाई आणि चेंग्दू यासारख्या चीनच्या काही शहरांमध्ये या मार्गासाठी संशोधन सुरु आहे.

जपान आणि जर्मनीसारखे देशही येथे मॅगलेव्ह ट्रेन चालवण्याचा विचार करत आहेत. मात्र या ट्रेनचे नेटवर्क तयार करण्यासाठी खूप खर्च आहे, म्हणून बर्‍याच देशांनी ही कल्पना सोडली आहे.