'मौत का पुल'! इथं जाणं तर दूर पण नुसतं फोटो पाहूनही लोकं थरथर कापतात, पाहा फोटो... By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 09:42 PM 2021-06-20T21:42:52+5:30 2021-06-20T21:48:33+5:30
पर्यटनाची आवड असणाऱ्यांना नवनव्या जागी भेट देणं खूप आवडतं. पण जगात एक असं ठिकाण आहे की जिथं जाण्यासाठी खूप हिंमत उराशी असावी लागते. अशाच एका ठिकाणाबद्दल जाणून घेऊयात... चीनमध्ये Coiling Dragon Cliff Skywalk या ब्रिजला 'मौत का पुल' असं संबोधलं जातं. यामागचं कारण तुम्हाला फोटो पाहूनच कळेल.
चीनमधील हा खतरनाक पुल पार करणं साहसी खेळांची आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी सर्वोत्तम ठिकाण समजलं जातं. इथं येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या कपाळावर घाम फुटतो.
चीनच्या तीयानमेन डोंगरावर या पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. हा पुल १०० मीटर लांब आणि पाच फूट रुंद आहे. जमिनीपासून या पुलाची उंची तब्बल १५०० मीटर इतकी आहे आणि हा पुल काचेपासून तयार करण्यात आला आहे.
२०१६ साली सर्वसामान्य जनतेसाठी पूल सुरू करण्यात आला. जगातील सर्वात भयावह ठिकाणांमध्ये या पुलाचा देखील समावेश केला जातो.
चीनच्या या खतरनाक पुलावर चालताना एक छोटीशी चूक देखील जीवावर बेतू शकते.
चीनच्या हुनाना प्रांतात हा पूल आहे. इथं जाणं तर दूरच पण या पुलाचे नुसते फोटो पाहूनच अनेकांना धडकी भरते. जगातील सर्वात खतरनाक स्कायवॉक म्हणून या पुलाची ओळख झाली आहे.
पुलाजवळ पोहोचताच त्याची उंची आणि नागमोडी वळण पाहूनच धडकी भरते. त्यात पूल काचेचा असल्यानं त्यावरुन चालताना खोल दरी पाहूनच पुलावर पाऊल टाकण्याआधीच लोक थरथर कापू लागतात.
पुलावर एकूण ९९ नागमोडी वळणं आहेत. त्यामुळे या पुलावरुन चालताना खूप काळजी घ्यावी लागते.
साहसी ट्रेकिंग आणि अशाच भन्नाट थ्रिलर गोष्टींचा अनुभव घेण्याची आवड तुम्हाला असेल तर चीनमधील या पुलाला एकदा नक्की भेट द्या.