बाबो! सौदीच्या राजकुमाराचा सर्वात आलिशान महाल, कामं करायला ठेवल्या होत्या सुंदर मॉडल्स! By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 01:18 PM 2020-09-02T13:18:36+5:30 2020-09-02T14:05:27+5:30
पुस्तकात सांगण्यात आले आहे की, राजकुमारला ३३ अब्जाची यॉर्ट फिरण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी मिळालंय. सोबत त्याच्या आलिशान महालात सर्वच सोयी-सुविधा आहेत. सौदी अरबमधील शेखांच्या लाइफस्टाईलबाबत तुम्ही नेहमीच ऐकलं असेल. शेख इतके श्रीमंत असतात की, ते पैसा पाण्यासारखा खर्च करतात. मोठमोठ्या महलांमध्ये ते राहतात आणि वाघ-सिंह घरात पाळतात. शेख लोकांकडे पेट्रोलच्या अनेक खाणी आहेत. यावरून त्यांच्या संपत्तीचा अंदाज लावता येतो.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या ब्लड अॅन्ड ऑइलमध्ये सौदीच्या राजकुमाराबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत. या पुस्तकात सांगण्यात आले आहे की, राजकुमारला ३३ अब्जाची यॉर्ट फिरण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी मिळालंय. सोबत त्याच्या आलिशान महालात सर्वच सोयी-सुविधा आहेत. राजकुमाराच्या नावावर पर्सनल आयलॅंडही आहे. जिथे तो आपल्या मित्रांसोबत पार्ट्या करतो.
सौदीचा होणारा भावी राजा मोहम्मद बिन सलमानबाबत या पुस्तकात अनेक खुलासे करण्यात आले आहेत. या पुस्तकात त्याच्या आयुष्याबाबत अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत ज्या वादग्रस्त आहेत.
या पुस्तकात खुलासा केला गेला आहे की, एकदा राजकुमार सलमान त्याच्या प्रायव्हेट आयलॅंडवर दीडशे तरूणींसोबत पार्टी करताना पकडला गेला होता.
पुस्तकात दावा केला गेला आहे की, या सर्वच मॉडेल ब्राझील, रशिया आणि मालदीव्समधून बोलवण्यात आल्या होत्या. या पार्टी राजकुमारचे काही मित्र होते आणि या मॉडल्स त्यांच्या मनोरंजनासाठी बोलवण्यात आल्या होत्या.
असेही सांगितले गेले की, जेव्या मॉडल्सना बोलवण्यात आलं तेव्हा त्यांना काही लैंगिक आजार तर नाही ना हे जाणून घेण्यासाठी सर्वांची टेस्ट करण्यात आली होती. ही पार्टी एक महिना सुरू होती.
ही पार्टी २०१५ मध्ये आयोजित करण्यात आली होती. राजकुमार सलमानच्या आयलॅंडवर त्याचा आलिशान महालही आहे. या सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा आहेत. राजकुमारचे सर्व गेस्ट इथेच थांबतात.
या मॉडल्स गेस्टच्या सर्व प्रकारच्या गरजांची काळजी घेत होत्या. पण अचानक या पार्टीची माहिती मीडियाला मिळाली आणि त्याबाबत बातम्या छापू लागले. त्यामुळे ही पार्टी लगेच बंद करावी लागली.
या पुस्तकानुसार, या पार्टीत साधारण २१ अब्ज ९६ कोटी ७७ लाख रूपये खर्च करण्यात आले होते. सर्व गेस्टसाठी महागडी दारू आणि मॉडल्स मागवल्या होत्या. या मॉडल्स भरपूर पैसे देऊन मागवण्यात आल्या होत्या.
यादरम्यान या मॉडल्सच महालातील सगळी कामे करत होत्या. आपल्या आवडीच्या काही मॉडल्स राजकुमाराने त्याच्या कामासाठी बुक केल्या होत्या. त्या त्याची सगळी कामे करत होत्या.
पुस्तकात असेही सांगितले आहे की, पार्टी सीक्रेट ठेवण्यासाठी मोबाइल वापरावर बंदी होती. इथे केवळ नोकिया ३३१० या फोनचा वापर होत होता.
राजकुमार सलमान हा पुढील १०, २० किंवा ३० वर्षे राजा होणार नाही. पण गादीचा पुढील उत्तराधिकारी तोच आहे. सध्या राजकुमार सलमान देशाचा डेप्युटी प्राइम मिनिस्टर आहे.