Convicted murderer sworn in as sri lankan mp premalal jayasekara
बाबो! ज्याला हत्येप्रकरणी सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा 'तो'च खासदार झाला; अन् मग..... By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 01:59 PM2020-09-09T13:59:11+5:302020-09-09T14:19:02+5:30Join usJoin usNext श्रीलंकेत मंगळवारी राजकारणाचं एक वेगळंच रुप पाहायला मिळालं. ज्या व्यक्तीला हत्येच्या आरोपासाठी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तोच व्यक्ती खासदार बनला आहे. गोंधळ घालत असलेल्या विरोधी पक्षासमोर त्यांनी खासदारकीची शपथ घेतली. श्रीलंकेचा सत्ताधारी पक्ष श्रीलंका पोडुजाना पार्टी (SLPP) चा खासदार बनवण्यात आलं आहे. मृत्यूची शिक्षा सुनावलेल्या या खासदाराचं नाव प्रेमालाल जयासेकरा आहे. याचं वय ४५ वर्ष असून हत्येच्या आरोपाखाली ३१ जुलैला दोषी ठरवण्यात आलं होत. प्रेमालाल यांनी दक्षिण पश्चिम रत्नापूर भागातून निवडणूक लढवली होती. न्यायालयाद्वारे जेलमधील महाआयुक्तांना मंगळवारी झालेल्या लोकसभेत प्रेमालाल यांना उपस्थित होण्याची व्यवस्था करण्याचे सांगण्यात आले होते. प्रेमलाल यांनी कोर्टाला अर्ज करून सभागृहात सहभागी होण्यासाठी परवानगी मागितली होती. या अर्जाजा विरोध करत अटॉर्नी जनरल यांनी मागच्या आठवड्यात कोर्टाला सांगितले होते की मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेल्या व्यक्तीला खासदार बनवणं अयोग्य आहे. कोर्टानं निर्णय प्रेमलाल यांची लढवलेली निवडणून अवैध समजलेली नाही. सभागृहात प्रेमलाल येताच इतर खासदारांनी गळ्यात काळा स्कार्फ लावून निषेध केला. घोषणाबाजीही करण्यात आली. त्याचवेळी प्रेमलाल यांनी खासदारकीची शपथ घेतली. यावेळी काही खासदारांनी नाराजीनं सभागृह त्याग केला. प्रेमलाल यांना जेलपासून सभागृहापर्यंत कडक सुरक्षेत आणलं गेलं होतं. २०१५ ला राष्ट्रपती निवडणूंकाच्या वेळी प्रेमलाल यांनी एका राजकिय कार्यकर्त्यांनी गोळी झाडून हत्या केली होती. मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेले प्रेमलाल हे पहिले खासदार आहेत. ADR च्या रिपोर्टनुसार भारतीय लोकसभेतील ४० टक्के खासदारांवर गुन्हे नोंदवले गेले आहेत. . आशियाई देशांमध्ये एका खासदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असणं ही सामान्य बाब आहे. Read in Englishटॅग्स :जरा हटकेनिवडणूकJara hatkeElection