Coronavirus : बोंबला! लॉकडाऊनमधे सूट मिळाली तर चीनच्या कंपनीत 'किसिंग कॉन्टेस्ट'चं आयोजन, फोटो व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:32 AM2020-04-22T10:32:28+5:302020-04-22T10:46:17+5:30

चीनच्या एका फॅक्टरीतून काही अनोखे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमधून लोक विचित्र खेळ खेळत असल्याचे दिसले.

चीनच्या वुहान शहरातून कोरोना व्हायरस जगभरात पसरला आणि आता या ठिकाणी कोरोना व्हायरसची लागण असलेला एकही रूग्ण नसल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे चीनमध्ये आता स्थिती सामान्य दिसत आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं आहे. काही ऑफिसेस हळूहळू सुरू करण्यात आली आहे. अशातच चीनच्या एका फॅक्टरीतून काही अनोखे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमधून लोक विचित्र खेळ खेळत असल्याचे दिसले.

या खेळाचं नाव आहे किसिंग कॉन्टेस्ट. हे किसिंग कॉन्टेस्टचे फोटो सोशल मीडियात फार व्हायरल झाले आहेत. तसेच लोक या फोटोंवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.

असे सांगितले जात आहे की, चीनमधे कोरोना व्हायरसच्या केसेस कमी झाल्यावर लॉकडाऊनला शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यानुसार, चीनच्या सूजौ शहरातील एक फॅक्टरी पुन्हा सुरू करण्यात आली. त्याचा आनंद कर्मचाऱ्यांनी अशाप्रकारे गेम खेळून साजरा केला.

या लोकांनी किसिंग कॉन्टेस्टचं आयोजन केलं होतं. ज्यात कर्मचारी एकमेकांना किस करताना दिसले. पण दोघांमधे एक काच ठेवण्यात आली होती.

दरम्यान, सोशल मीडियावरील लोक अशा घटनांवर जोरदार टीका करत आहेत. लोकांचं मत आहे की, चीन सरकारने काही अटी ठरवून लॉकडाऊनमधे सूट दिला आहे. तर या कंपनीने नियमांचं उल्लंघन केलं आहे.

ग्लोबल टाइम्सचं मत आहे की, किसिंग कॉन्टेस्ट कंपनी सुरू करण्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी ठेवण्यात आलं होतं. तर दुसरीकडे फॅक्टरीच्या मालकाने सांगितले की, किसिंग कॉन्टेस्ट दरम्यान दोघांमध्ये काच ठेवण्यात आली होती. तसेच त्यांनी सांगितले की, फॅक्टरीमध्ये काही विवाहित जोडपे आहेत.

महामारीमुळे लोकांमध्ये वाढलेला तणाव कमी करण्यासाठी या खेळाचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलं. पण हा भयंकर प्रकार असून यात नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे.