'दुसऱ्या पत्नीकडे जाण्यासाठी पास मिळेल का?', पोलिसांनी दिलेलं उत्तर वाचून लोटपोट होऊन हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 10:09 AM2020-04-10T10:09:00+5:302020-04-10T10:39:46+5:30

अशात लोकांच्या मदतीसाठी पोलिसांनी हेल्पलाईन नंबर जारी केली आहे. यावर हजारो लोक फोन करून वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत.

सौदी अरबमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या 2700 पेक्षा जास्त केसेस समोर आल्या आहेत. तर 41 पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे आणि संक्रमित भागांमध्ये स्टरलायजेशन प्रोग्रामची सुरूवात करण्यात आली आहे. (प्रातिनिधीत फोटो)

अशात लोकांच्या मदतीसाठी पोलिसांनी हेल्पलाईन नंबर जारी केली आहे. यावर हजारो लोक फोन करून वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. यात काही असेही प्रश्न असतात ज्याने पोलिसांच्या तर चेहऱ्यावर हसू येतंच, तुमच्याही येईल.

गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, दुबई पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांना एक फोन कॉल आला होता. ज्यात एका व्यक्तीने लॉकडाऊन दरम्यान त्याच्या दुसऱ्या पत्नीकडे जाण्यासाठी कर्फ्यू पासची मागणी केली.

दरम्यान यावेळी नेमके पोलिसांचे मुख्य रेडिओ कार्यक्रमावर हजर होते. ते लोकांना कोरोना आणि लॉकडाऊनबाबत सूचना देत होते. याच कार्यक्रमात लोकांना त्यांचे प्रश्न विचारण्याची सुविधा होती.

यातच एका व्यक्तीने फोन करून विचारले की, त्याला त्याच्या दुसऱ्या पत्नीकडे जाण्यासाठी कर्फ्यू पास मिळू शकतो का?

या व्यक्तीचा हा प्रश्न ऐकून रेडिओवर लाईव्ह असलेले दुबई ट्रॅफ्रिक पोलिसांचे मुख्य ब्रिगेडिअर सैफ मुहैर अल माजरोइ यांना हसू आवरता आले नाही.

त्यांनी त्या व्यक्तीला उत्तर दिले की, 'हा तर दुसऱ्या पत्नीला न भेटण्याचा एक चांगला बहाना आहे. हे चांगलं आहे की, त्यांना भेटण्यासाठी तुमच्याकडे पास नाही'.

तसेच ते हेही म्हणाले की, 'सध्या अशा केसेसमध्ये परमिट दिलं जात नाहीये. काही दिवस तुम्ही एकाच पत्नीसोबत रहा आणि असंच काम भागवा'.

रेडिओ कार्यक्रमात सैफ मुहैर यांनी सांगितले की, मला लॉकडाऊननंतर अशाप्रकारचे शेकडो फोन आले आहेत. पण परमिट केवळ अत्यावश्यक सेवेसाठी आहेत. अत्यावश्यक सेवेत नोकरी करणाऱ्यांना किंवा मेडिकल इमरजन्सीसाठी हे पास दिले जातात.

जर आम्ही लोकांना वस्तू खरेदीसाठी किंवा कुणाला भेटण्यासाठी पास देत राहिलो तर लॉकडाऊनला काही अर्थच राहणार नाही. आम्ही संक्रमण असलेल्या भागांना क्लिन करत आहोत आणि या ठिकाणांवर जाण्याची परवानगी कुणालाही नाही.