Coronavirus : कोरोनामुळे बंद हॉटेलमध्ये काही दिवस लपून राहिला अन् लाखो रूपयांचं खाऊन-पिऊन गेला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 02:23 PM2020-04-19T14:23:54+5:302020-04-19T14:39:42+5:30

असाच एक व्यक्ती एका बंद रेस्टॉरन्टमध्ये घुसला. चार दिवस तिथेच त्याने खाल्लं-पिलं आणि झोपला.

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांना आपल्या घरात स्वत:ला कोंडून घ्यावं लागलं आहे. अनेकजण तर रस्त्यावर आहेत तर काहींना फारच वाईट स्थितीत रहावं लागत आहे. अशात लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या विचित्र घटना समोर येत आहेत.

असाच एक व्यक्ती एका बंद रेस्टॉरन्टमध्ये घुसला. चार दिवस तिथेच त्याने खाल्लं-पिलं आणि झोपला. या 42 वर्षीय व्यक्तीवर आरोप आहे की, त्याने चार दिवसात लाखो रूपयांचं खाल्लं आणि दारूही प्यायली. (Image Credit : ratchetfridaymedia.com)

ही घटना अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यातील न्यू हेवन शहरात घडली. 42 वर्षीय लुईस ऑर्टिजवर पोलिसांनी अनेक गुन्हे नोंदवले आहेत आणि त्याला तुरुंगात टाकलंय.

ऑर्टिज Soul De Cuba नावाच्या रेस्टॉरन्टमध्ये घुसला होता. हे रेस्टॉरन्ट कोरोना व्हायरसमुळे बंद करण्यात आलं होतं. गेल्या मंगळवारी मॅनेजरने एक अज्ञात व्यक्ती रेस्टॉरन्टमध्ये घुसल्याची माहिती पोलिसांना दिली होती.

ऑर्टिज Soul De Cuba नावाच्या रेस्टॉरन्टमध्ये घुसला होता. हे रेस्टॉरन्ट कोरोना व्हायरसमुळे बंद करण्यात आलं होतं. गेल्या मंगळवारी मॅनेजरने एक अज्ञात व्यक्ती रेस्टॉरन्टमध्ये घुसल्याची माहिती पोलिसांना दिली होती.

पोलिसांनी सांगितले की, ऑर्टिजकडून रमची बॉटलही ताब्यात घेण्यात आली आहे. रेस्टॉरन्टच्या मॅनेजमेंटने सांगितले की, ऑर्टिजने लाखो रूपयांच जेवण केलं आणि दारूही प्यायला.

रेस्टॉरन्टच्या अधिकाऱ्यांनुसार, ऑर्टिज दारूच्या 70 बॉटल एकतर प्यायला असेल किंवा चोरून घेऊन गेला असेल.

सीसीटीव्ही फुटेजमधून हे दिसतं की, आरोपी व्यक्ती 11 एप्रिलला खिडकीतून रेस्टॉरन्टमध्ये शिरला. बाहेर निघताना तो सोबत खाण्या-पिण्याच्या काही वस्तूही घेऊन गेला होता.

कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला असून जास्तीत जास्त ठिकाणी अजूनही लॉकडाऊन करण्यात आलं आहे. ऑफिसेस बंद आहेत आणि लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे मोठ्या संख्येने लोक बेरोजगार झाले आहेत. त्यांना महिन्याचा खर्च चालवण्यासाठीही अडचण येत आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन विरोधात प्रदर्शनेही करण्यात आली आहेत.