CoronaVirus News Marathi : Bats disease transmission covid 19 pandemic myb
वटवाघळांमुळेच का लोकांमध्ये पसरतात जीवघेणे व्हायरस, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 06:03 PM2020-05-07T18:03:51+5:302020-05-07T18:28:55+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसाराबद्दल अजूनही काहीही स्पष्ट झालेले नाही. पण गेल्या काही दिवसात विविध देशातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात असं दिसून आलं की, कोरोना व्हायरस हा वटवाघळांमुळे पसरला आहे. वटवाघळांमार्फत या आजारांची लागण माणसांना झाली, कोणताही आजार असो सार्स, कोरोना, इबोला यांसारखे जीवघेणे आजार वटवाघळांमार्फतच का पसरू शकतात. याचं कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वटवाघळांमध्ये कोरोना विकसीत होत आहेत. वटवाघळांच्या एका प्रजातींतून इतर प्रजातींमध्ये व्हायरस सहजतेने पसरत नाही. वटवाघळांमध्ये इबोला, निपाह यांसारखे व्हायरस असताात. त्यामुळे इतर प्राण्यांच्या तुलनेत माणसांमध्ये या व्हायरसच्या संक्रमणाचा जास्त प्रसार होतो. शिकागोच्या फिल्ड म्यूजियम ऑफ नॅचुरल हिस्ट्रीमधील प्राणी निरीक्षक ब्रूस पॅटरसन यांनी दिलेल्या माहितीनुसार वटवाघळांच्या शारीरिक वेगळेपणामुळे वटवाघळांमुळे विभिन्न प्रकारचे व्हायरस दिसून येतात. स्तनधारी प्राण्यांमध्ये वटवाघळांचा समावेश होतो. वटवाघळं सर्वाधिक वेळ इतर प्रजातींसोबत एकत्र राहून घालवतात. वटवाघळांची सगळ्यात मोठी गुहा टेक्सास मध्ये आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या ठिकाणी एक कोटीपेक्षा जास्त वटवाघळं असतात. वटवाघळांची रोगप्रतिकारकशक्ती बळकट असते. त्यामुळेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आपल्या शरीरात घेऊन वटवाघळांच्या आरोग्यावर परिणाम होत नाही. तुलनेने अन्य स्तनधारी प्राणी रॅबिजसारख्या गंभीर इन्फेक्शचे शिकार होतात. वटवाघळांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक शक्ती असतात. त्यामुळे ते जास्तवेळ आजारी राहत नाहीत. हिवाळ्याच्या दिवसात वटवाघळ आपली उर्जा वाचवण्यासाठी आराम करतात. लहान वटवाघळं या कालावधीत फंगसं म्हणजेच बॅक्टरीयांचे शिकार होतात. अशी माहिती तज्ञांनी दिली आहे. वटवाघळांमध्ये प्रतिकारकशक्ती जास्त असल्यामुळे त्याच्यात उडण्याची क्षमता जास्त असते. वटवाघळांमध्ये उर्जा जास्त असल्यामुळे त्यांचा मॅटाबॉलिक रेट जास्त असतो. अन्नाचे पचन झाल्यानंतर त्याच उर्जेत रुपांतर होतं. पॅटरसन यांनी दिलेल्या माहितीनुसार मेटाबॉलिजम चांगले असल्यामुळे आपल्या डीएनएची वाढ रोखू शकतो. म्हणून वटवाघळांमुळे इतर वटवाघळांच्या प्रजातीत हा आजार पसरत नाही. कोणत्याही व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर शरीरातील रक्तवाहिन्यांवर प्रभाव पडतो. पण वटवाघळं अनुवांशिकतेनुसार आपल्या डिेएनएची सुरक्षा करण्याासाठी उर्जेचा पूरेपुर वापर करतात. आपल्या क्षमतेमुळे वटवाघळं जास्तीत जास्त काळ जीवंत राहू शकतात. पॅटर यांनी दिलेल्या माहितीनुसार भूरसट रंगाची वटवाघळं ३० पेक्षा जास्त वर्ष जीवंत राहू शकतात. शरीरातील गरमी आणि उष्णतेमुळे त्यांना व्हायरसशी लढण्याची शक्ती मिळते. वटवाघळांच्या शरीररचनेमुळे हे व्हायरसला जास्तवेळपर्यंत आपल्या शरीरात ठेवू शकतात. त्यामुळेच इतर जीवांमध्ये हा व्हायरस झपाट्याने पसरत जातो. टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusCoronavirus in Maharashtra