Coronavirus: Police gifted a TVS moped to Janmoni Gogoi who sells vegetables on a bicycle pnm
Coronavirus: सायकलवरुन भाजी विकणाऱ्या ‘त्या’ तरुणीला पोलिसांनी दिलं गिफ्ट; सर्वांची मनं जिंकली! By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 02:26 PM2020-05-13T14:26:33+5:302020-05-13T14:30:46+5:30Join usJoin usNext सध्या देशात कोरोनाचं संकट उभं राहिलं आहे. अशातच देशव्यापी लॉकडाऊन सुरु असल्याने पोलिसांवरचा ताण वाढला आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून पोलिस जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उभे आहेत. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आलं आहे. लॉकडाऊन तोडल्यामुळे अनेकांना पोलिसांनी मारल्याचं, शिक्षा दिल्याचं व्हायरल झालं आहे. पण काही महाभागांना या शिक्षेची गरजही आहे. पण पोलिसांच्या या मारहाणीचा काहींना निषेध पण केला आहे. लॉकडाऊन काळात पोलिसांच्या विविध रुपाचं दर्शन सर्वांना होत आहे. काही ठिकाणी कठोर तर काही ठिकाणी माणुसकीचं दर्शन पोलिसांच्या रुपात पाहायला मिळत आहे. भूकेल्यांना अन्न देण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर डिब्रूगड पोलिसांचा फोटो व्हायरल होत आहे. ११ मे रोजी पोलिसांनी त्याच्या ट्विटर हँडलवरुन हा फोटो शेअर केला त्याला हजारोंच्या संख्येने लाईक्स आणि रिट्विट करण्यात आलं. पोलिसांच्या या कृत्याने अनेक नेटिझन्सची मनं जिंकली. जनमोनी गोगोई ही मुलगी कुटुंबाचं पोट भरण्यासाठी सायकलवरुन भाजी विकण्याचं काम करते. तिच्या आत्मविश्वासने प्रेरित होऊन पोलिसांनी तिला बाईक भेट म्हणून दिली. ज्यामुळे तिचं काम सुलभ होईल. याबाबतची माहिती पोलिसांनी ट्विटवरुन दिली आहे. जनमोनी गोगोई ही डिब्रूगड जिल्ह्यातील बोगीबील परिसरात राहणारी आहे. तिने जिल्हा शाळेत १२ वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. जनमोनीला पुढील शिक्षण घेण्याची प्रचंड इच्छा होती पण घरची परिस्थिती बिकट असल्याने तिला शिक्षण सोडावं लागलं. कुटुंबीयांचं पोट भरण्यासाठी तिने सायकलवरुन भाजी विकण्याचं काम सुरु केलं. पोलिसांनी तिच्या या आत्मविश्वासाचं कौतुक करत तिचं काम सोप्प करण्यासाठी तिला बाईक भेट म्हणून दिली. पोलिसांनी केलेल्या या कृत्याचं सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्यापोलिसcorona virusCoronaVirus Positive NewsPolice