coronavirus Russian Nurse wore just lingerie under transparent PPE kkg
केवळ अंतर्वस्त्रांवर पारदर्शी पीपीई किट घालून हॉस्पिटलला गेली रशियन नर्स, अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 02:50 PM2020-05-21T14:50:42+5:302020-05-21T17:02:56+5:30Join usJoin usNext जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला असून बाधितांचा आकडा ५० लाखांच्या पुढे गेला आहे. जगभरातले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करताना अनेक डॉक्टरांना, परिचारिकांना कोरोनाची लागण होत आहे. मात्र तरीही मोठ्या हिमतीनं वैद्यकीय कर्मचारी वर्ग कोरोना संकटाचा मुकाबला करत आहे. पीपीई किट घालून रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र तरीही डॉक्टर परिस्थितीशी दोन हात करत आहेत. कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या डॉक्टरांच्या, परिचारिकांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असताना रशियातल्या एका नर्सचे फोटो वेगळ्याच कारणामुळे व्हायरल झाले आहेत. रशियातल्या एका परिचारिकेनं पीपीई खाली केवळ अंतर्वस्त्रं घातली होती. या परिचारिकेकडे एका वॉर्डची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या वॉर्डमध्ये सगळे पुरुष रुग्ण होते. टुलामधील एका रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी परिचारिका आली असताना, रुग्णांपैकी कोणीतरी तिचा फोटो काढला. त्यानंतर तो अल्पावधीत व्हायरल झाला. वैद्यकीय सेवा देण्यासाठी आवश्यक गणवेश परिधान न केल्यानं संबंधित परिचारिकेवर रुग्णालय प्रमुखांनी कारवाई केली. विशीतल्या नर्सला पीपीईखाली कपडे का घातले नाहीत, याबद्दल विचारणा करण्यात आली. तेव्हा पीपीईमध्ये उकाडा जाणवत असल्याचं तिनं सांगितलं. कोरोना वॉर्डमधील रुणांच्या चाचणीसाठी परिधान केलेलं पीपीई इतकं पारदर्शक असेल, असं वाटलं नव्हतं, असंदेखील परिचारिकेनं टुला वैद्यकीय रग्णालयाच्या व्यवस्थापकांना सांगितलं. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनानं संबंधित परिचारिकेवर कारवाई केली. मात्र या कारवाईची माहिती उपलब्ध झालेली नाही. रशियामधील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या घरात असून मृतांचा आकडा तीन हजाराच्या पुढे गेला आहे.Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus