Coronavirus: woman learns sister is alive after cremating wrong body in ecuador pnm
Coronavirus: मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर 'जिवंत' झाली महिला; डॉक्टर अन् कुटुंबाला बसला जबर धक्का By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:58 PM2020-04-27T15:58:52+5:302020-04-27T16:03:03+5:30Join usJoin usNext चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगातील २०० देशांवर संकट उभं केलं आहे. आतापर्यंत ३० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर २ लाखांहून जास्त मृत्यू झाले आहेत. पाश्चात्य देशात कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे त्यामुळे याठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहेत. कोरोना मृतदेहाला हात लावण्यासही खबरदारी घेतली आहे. अशातच एक्वेडोरमध्ये कोरोना विषाणूशी झुंज देत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका महिलेने बहिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण काही दिवसांनी तिची बहीण जिवंत असल्याचे समजताच तिला मोठा धक्का बसला. खरं तर, गुआयाक्विल शहरात राहणारी ७४ वर्षीय अल्बा मरूरी यांना २७ मार्च रोजी उच्च ताप आणि श्वासोच्छवासाची अडचण झाल्याच्या तक्रारीनंतर एबल गिलबर्ट पोंटॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनासारख्या लक्षणांमुळे, डॉक्टरांनी त्यांना इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये दाखल केले. अल्जाजीरा न्यूज वेबसाइटच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांनंतर अल्बाची बहीण ऑरा मरूरी यांना रुग्णालयातून फोन आला. त्यांना रुग्णालयाच्या कर्मचार्यांनी सांगितले होते की त्याची बहीण अल्बा मरण पावली आहे आणि आपण तिचा मृतदेह घेऊन जा. अल्बा मरुरी कोरोना संशयास्पद होत्या, म्हणून तिच्या कुटूंबाला रुग्णालयाच्या कर्मचार्यांनी मृतदेहापासून अंतर ठेवण्याची सूचना केली नाहीतर संपूर्ण कुटुंब कोरोनाचा शिकार होईल. म्हणून अल्बाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयातील कर्मचार्यांच्या सूचनांचे पालन केले आणि काळजीपूर्वक शरीरावर अंत्यसंस्कार केले. अल्बाच्या मृत्यूची माहितीही कुटुंबीयाने नातेवाईकांनाही दिली होती. मात्र काही दिवसांनंतर अल्बाची बहीण ऑरा यांना रुग्णालयातून फोन आला. त्यांना सांगितले गेले की अल्बा मरुरीला बोलायचे आहे हे ऐकून संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. त्यांना वाटलं की कोणी थट्टा करीत आहे. सुरुवातीला तिच्यावर विश्वास नव्हता, त्यानंतर जेव्हा तिला अल्बाच्या जिवंत असल्याची बातमी मिळाली तेव्हा तिला धक्का बसला. फोन कॉलनंतर काही तासांनंतर, एक रूग्णवाहिका ऑरा मरुरीच्या घरी आली. रुग्णालयाचे कर्मचारी डॉक्टरसमवेत रुग्णवाहिकेत उपस्थित होते. त्यांनी अल्बाच्या कुटूंबाची माफी मागितली आणि असे सांगितले की गैरसमजांमुळे त्यांनी अल्बाच्या कुटूंबाकडे दुसर्याचा मृतदेह दिला होता. त्याचबरोबर ऑरा म्हणाली की, या घटनेनंतर त्यांना झोप येत नाही. कोणाच्या मृतदेहावर त्यांनी अंत्यसंस्कार केले हे त्यांना ठाऊक नाही. अस्थीही घरात ठेवली आहे. दुसरीकडे, अॅबिल गिलबर्ट पोंटन हॉस्पिटलने आतापर्यंत त्यांनी केलेल्या चुकीचं कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus