नादखुळं जोडपं! लाखो रुपये जमवून जगभर फिरतंय! By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 03:31 PM 2019-01-11T15:31:07+5:30 2019-01-11T15:39:59+5:30
काहीतरी थरारक किंवा वेगळं काहीतरी करण्यासाठी लोक काय करतील काही सांगता येत नाही. काहीच्या काही आयडिया लोकांच्या डोक्यात येतात आणि ते पूर्णत्वासही नेतात. असंच काहीसं करत आहेत न्यूझीलॅंडचे पीटर आणि डच महिला मिरियम. दोघे कपल आहेत. पण ओपन रिलेशनशिपमध्ये आहेत. पीटरचं वय ६४ तर मिरियमचं वय ३४. दोघांनाही हिंडण्या-फिरण्याची आवड. दोघेही थोडी विचित्र जगणं जगत आहेत.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, मिरियम आणि पीटर या दोघांचा काही एक पत्ता सांगता येणार नाही. दोघेही श्रीमंत परिवारातील आहेत. पण आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते आपापली गाठोडी घेऊन निघाले आहेत. मिरियम एक यशस्वी अॅथलिट आहे पण तिने ते सोडलं. पीटरची आणि तिची भेट भारतात झाली होती. पीटर स्वत: इकोलॉजीचे प्राध्यापक होते. पण त्यांनीही नोकरी सोडली आणि रस्त्यावरचं जगणं स्विकारलं.
पीटर सांगतात की, एके दिवसी मी स्टाफ मीटिंग रुममध्ये बसलो होतो. खिडकीबाहेर बघत होतो. तेव्हाच मी विचार केला की, या रुममध्ये बसून मला तासाला ५० डॉलर(साधारण ३५०० रुपये) मिळतात. पण माझं जीवन तर खिडकीच्या बाहेरील दुनियेत आहे.
ते पुढे सांगतात की, आयुष्यात मी स्वतंत्र होण्याचं जे सर्वात मोठं काम केलं, ते म्हणजे घर सोडण्याचं. मी घराच्या चाव्या इस्टेट एजंटसाठी लेटर बॉक्समध्ये सोडून एअरपोर्टसाठी निघून आलो. तेव्हापासून मी बाहेरच आहे.
मिरियम आणि पीटर दोघेही आता अनुभवी शिकारी झाले आहेत. पीटर जेवण तयार करतो, तर मिरियम जनावरांची शिकार करुन आणते. दोघेही एकत्र वेगवेगळ्या देशातील विचित्र स्थळांची सैर करतात. फार कमी आणि केवळ गरजेचंच सामान सोबत ठेवतात.
सर्वात इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे दोघांची जीवनशैली आहे. मिरियम सांगते की, ती नेहमीच तिचे केस नदीच्या पाण्याने धुते. तसेच ती शम्पूऐवजी लघवीचा केस धुण्यासाठी वापर करते. दोघांनी त्यांच्यासाठी सध्या ३६ लाख रुपये बचत करुन ठेवले आहेत. दरवर्षीते २.६९ लाख रुपये खर्च करतात.