craziest invention of japan you never knew existed
'अशा' भन्नाट वस्तू फक्त जपानमध्येच दिसू शकतात By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 03:27 PM2018-09-06T15:27:20+5:302018-09-06T15:30:38+5:30Join usJoin usNext भन्नाट छत्री: जपानमध्ये वापरण्यात येणारी छत्री व्यक्तीला डोक्यापासून पायापर्यंत कव्हर करते. त्यामुळे दिसायला जरी छत्री विचित्र असली, तरी ती अतिशय उपयुक्त आहे. मायक्रोवेबल पग: थंडीच्या दिवसात हा पग अतिशय उपयोगी ठरतो. हा पग ओव्हनमध्ये गरम करता येतो. त्यामुळे रात्री झोपताना पगला कवटाळलं की थंडी वाजत नाही. टॉयलेट स्लीपर्स: जपानमध्ये स्वच्छतेचे नियम खूप कडक आहेत. अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद असल्यानं जपानी लोक टॉयलेटला जाताना खास स्लीपर्स घालतात. बेबी मोप्स: स्वच्छतेला महत्त्व असल्यानं जपानी लोकांनी बेबी मोप्सची निर्मिती केली. यामुळे बाळ जरी घरात रांगत असेल, तरी लादी स्वच्छ होते. लहान एस्केलेटर: जपानमधील कवासकी शहराच्या तळघरात एका दुकानात जगातील सर्वात लहान एस्केलेटर आहे. हा एस्केलेटर फक्त पाचऱ्यांचा आहे. त्याची उंची केवळ 33 इंच आहे. एकाकी पुरुषांसाठी उशी: जपानमध्ये एकाकी पुरुषांसाठी अशी भन्नाट उशी तयार करण्यात आली आहे.टॅग्स :जरा हटकेजपानJara hatkeJapan