Czech Republic Sedlec Ossuary have 40000 human skeleton
झुंबर, माळा अन् काय काय... तब्बल ४० हजार मानवी सांगाड्यांची सजावट By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 10:33 PM2019-10-16T22:33:34+5:302019-10-16T22:50:59+5:30Join usJoin usNext झेक प्रजासत्ताकमधील सेडलॅक ओशरी एका वास्तूमध्ये तब्बल ४० हजार सांगाडे आहेत. अनेक ठिकाणी सजावटीसाठी मौल्यवान, आकर्षक वास्तूंचा वापर होतो. मात्र या वास्तूमध्ये सांगाड्यांपासून झुंबर, माळा तयार करण्यात आल्या आहेत. सांगाडा पाहताच अनेकांची बोबडी वळते. मात्र या ठिकाणी त्याच वस्तूंचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे. माणसाच्या शरीरात विविध ठिकाणी असलेल्या हाडांचा अतिशय कल्पक वापर वास्तूच्या सजावटीत करण्यात आला आहे. हाडांचा वापर करुन अशा प्रकारे सजावट तयार करण्याचं कारण काय, असा प्रश्न या वास्तूत आल्यावर अनेकांना पडतो. सापळ्यांपासून तयार करण्यात आलेल्या या सजावटीमागचं कारण अतिशय रंजक आहे. जागा वाचवण्यासाठी सांगाड्यांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे. मानवी सांगाड्यांचा इतका कल्पक वापर तुम्ही आजवर पाहिला नसेल.टॅग्स :जरा हटकेJara hatke