पार्थिवासोबत डान्स करणं, लिंगाची जत्रा काढणं 'या' आहेत जगातल्या चित्रविचित्र परंपरा By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 06:54 PM 2021-07-22T18:54:29+5:30 2021-07-22T19:12:29+5:30
जगात सर्वच देशांच्या संस्कृतीत तेथील परंपरा, चालीरीती आणि रुढी यांचा समावेश असतो. त्या देशाची ती सांस्कृतिक ठेवण असते. अनेक देशांमध्ये अनेक चित्रविचित्र परंपराही असतात. काही ठिकाणी गाईचे रक्त पिणं शुभ मानलं जातं तर काही ठिकाणी पार्थिवासोबत नाच केला जातो...या आणि अशा अनेक परंपरा जाणून घेऊया... कंबोडियात (combodia)मुलींची मासिक पाळी सुरू झाल्यानंतर म्हणजेच ती 13 ते 15 वर्षाची झाल्यानंतर मुलीचा पिता तिच्यासाठी वेगळी झोपडी बांधतो. याला लव्ह हट म्हणतात. या झोपडीत झोपण्यासाठी एक बेड आणि अन्य गरजेच्या वस्तू ठेवल्या जातात. यानंतर तिथले पालक आपल्या मुलीला तिचा पती निवडता यावा याकरिता मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचं स्वातंत्र्य देतात. जोपर्यंत मुलीला आपल्या आवडीचा पती मिळत नाही, तोपर्यंत ती असं करू शकते. मुलीने आपल्या नियोजित पतीची निवड केल्यानंतर तिचा त्या मुलाशी विवाह लावण्यात येतो.
दक्षिण केनिया (South Kenya) आणि उत्तर टांझानियामधल्या ( North Tanzania) मसाकी नावाच्या समाजातले लोक एका बाणानं गायीला जखमी करतात. त्यानंतर एक एक करून लोक तिचं रक्त पितात. प्रामुख्याने लग्न आणि बाळाच्या जन्मप्रसंगी असं केलं जातं.
मादागास्करमध्ये फामदिहाना नावाची परंपरा साजरी केली जाते. दर ७ वर्षांनी ही परंपरा साजरी केली जाते. या परंपरेचं वैशिष्ट्य म्हणजे येथे मालागासी समाजातले लोक आपल्या पूर्वजांचं दफन केलेलं पार्थिव कबरीतून काढून त्याला नव्या कपड्यांमध्ये पुन्हा गुंडाळतात आणि पुन्हा दफन करतात. त्यानंतर कबरीभोवती संगीतावर नृत्य केलं जातं.
जापानमध्ये (japan)सेक्स लाइफ (Sex Life) समाधानकारक आणि आनंदी राहण्यासाठी पेनिस फेस्टिव्हल (Penis Festival) साजरा केला जातो. या फेस्टिव्हलमध्ये पेनिसची प्रतिकृती तयार करून तिची मिरवणूक काढली जाते. या फेस्टिव्हलचं आयोजन दर वर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या रविवारी केलं जातं.
तिबेटमध्ये (Tibet) असं मानलं जातं की मृत्यूनंतर शरीर कोणत्याही कामाचं नसतं. त्यामुळे मृतदेह एका विशिष्ट डोंगरावर फरपटत नेला जातो आणि तिथे मृतदेहाचे बारीक तुकडे केले जातात. प्राण्यांचं पोट भरण्यासाठी मृतदेह तसाच सोडून दिला जातो.
इंडोनेशियातल्या (Indonesia) तिदोंग समाजात नवदांपत्यं लग्नानंतर 3 दिवस बाथरूमचा वापर करू शकत नाहीत. याचाच अर्थ ते 3 दिवस ना शौचाला जाऊ शकत, ना मूत्रविसर्जन करू शकत. तसंच आंघोळ करण्यावरही 3 दिवस बंदी असते. यातून या नवदांपत्यांच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली जाते. हे केल्यास वैवाहिक आयुष्य चांगलं जातं, असा त्यांचा विश्वास आहे.
चीनमध्ये तर भयानक परंपरा आहे. चीनमध्ये (China) पत्नी गर्भवती राहिल्यानंतर तिचा पती बाळाच्या सुरक्षेसाठी आपल्या पत्नीला खांद्यावर घेत पायात चप्पल न घालता जळत्या कोळशांवरून चालतो. असं केल्यानं पत्नीची डिलिव्हरी नॉर्मल होते, तसंच बाळाचं आरोग्य चांगलं राहतं, असा त्यांचा समज आहे.
इंडोनेशियातही (Indonesia) अशीच एक विचित्र प्रथा आहे. त्यानुसार, कुटुंबातल्या सदस्याचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबातली महिला आपलं एक बोट कापून टाकते. गेल्या काही वर्षांपासून या प्रथेवर बंदी घालण्यात आलेली आहे; मात्र काही कुटुंबं अजूनही ही प्रथा पाळतात.
ग्रीकमध्ये (greek) लग्नात नवऱ्याची दाढी केली जाते. एवढंच नाही तर मुंडनही करावं लागतं. त्यानंतर नवऱ्याची होणारी सासू त्याला मध आणि बदाम खायला घालते.
आपण जाणूनबुजून कधीही आईसक्रिम जमिनीवर टाकत नाही. पण नववर्षाच्या स्वागताला स्वित्झर्लंड मध्ये लोक जाणूनबुजून जमिनीवर आईसक्रिम पाडतात त्यामुळे आयुष्यात गुडलक आणि संपन्नता येते असा समज आहे.