मृत व्यक्तींच्या दातांची अंगठी, केसांचे नेकलेस; या महिलेला आहे अशी ज्वेलरी तयार करण्याचा शौक By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 08:15 PM 2021-07-15T20:15:55+5:30 2021-07-15T20:20:36+5:30
Jacqui Williams: ऑस्ट्रेलियामधील एक महिला चक्क मृत व्यक्तींच्या दातांचे दागिने बनवून इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे. असे दागिने घडवणे हा आपला छंद असल्याचे या महिलेने सांगितले आहे. महिलांना असलेली दागदागिन्यांची आवड ही सर्वश्रुत आहे. केवळ भारतातच नाही तर जगातील सर्वच भागात महिला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने परिधान करणे पसंत करतात. ऑस्ट्रेलियामधील एक महिला चक्क मृत व्यक्तींच्या दातांचे दागिने बनवून इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे. असे दागिने घडवणे हा आपला छंद असल्याचे या महिलेने सांगितले आहे.
जॅकी विल्यम्स ही महिला ग्रेव्ह मेटलम ज्वेलर्सची मालकीण आहे. ती मेलेल्या लोकांच्या दातांच्या अंगठ्या, बांगड्या आणि नेकलेस बनवून विकते. काही दागिन्यांमध्ये मानवी अवशेषांचाही समावेश असतो, त्यामध्ये केस किंवा राखेबरोबरच कुठल्याही कुटुंबातील सदस्याचा आययूडीही दागिन्यामध्ये वापरला जातो.
जॅकी ही आधी एका स्थानिक दफनभूमीमध्ये माळी म्हणून काम करत असे. दरम्यान, तिला एक आजार असल्याचे तिने मान्य केले आहे. कारण मृत व्यक्तींच्या अवशेषांपासून दागिने बनवण्याचे काम करण्याचा विचार सर्वसामान्य व्यक्ती करू शकत नाही. मात्र तिच्या ज्वेलरीमुळे लोकांना त्यांच्या प्रिय व्यक्तींच्या शोकामधून सावरण्यामध्ये मदत होऊ शकते, असे ती सांगते.
जॅकी सांगते की, ती गिऱ्हाईकाच्या विनंतीनुसार तिच्या कुटुंबामध्ये मृत्यू झालेल्या सदस्यांच्या दातांपासून दागिने बनवते. असे केवळ स्पेशल ऑर्डर आल्यावरच केले जाते.
लोकांना त्यांच्या जवळील व्यक्तीच्या जाण्याचे दु:ख आणि नुकसानामधून सावरण्यास मदत करण्याची माझी इच्छा असते. त्यामुळे मी हे काम करते. हे असे काही जे प्रत्येकाला सुखच देईल, असे जॅकी सांगते.
प्रत्येक कस्टम पीस ज्वेलरीला बनवण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांचा वेळ लागतो. प्रत्येक पीससाठी जॅकी ३५० डॉलरपासून १० हजार डॉलरपर्यंतची रक्कम आकारते. त्यासाठी कस्टमरलाच मेटल पुकवावे लागते.
जॅकीने २०१७ पर्यंत मेलबर्न पॉलिटेक्निकमध्ये ज्वेलरी आणि ऑब्जेक्ट डिझाइनमध्ये डिप्लोमा केला होता. ग्रॅज्युएशननंतर तिने या क्षेत्रात नोकरीही केली. नंतर तिने आपला व्यवसाय सुरू केला.