चंद्रावरची जमीन झाली आता झाली Virtual Real Estate ची विक्री, किंमत ऐकुन बसेल धक्का By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 07:39 PM 2021-12-21T19:39:20+5:30 2021-12-21T19:49:43+5:30
Virtual embassy projects : Decentraland मध्ये एक कंपाऊंड बांधलं जात आहे. यात ऑनलाइन मेटाव्हर्सची सुविधा असणार आहे. त्यात प्रवेश करण्यासाठी संगणक किंवा हेडसेटची आवश्यकता असेल. Decentraland मधील Virtual real estate ला 2.43 मिलियन डॉलरमध्ये विकण्यात आलं आहे. त्यामुळं आता त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. Metaverse हे असे आभासी जग आहे, जिथे तुम्हाला वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळणार आहे. जरी हे संगणकाद्वारे तयार केलेले जग आहे, परंतु ते वास्तविक जगापेक्षा अधिक वास्तविक दिसते. Metaverse ला इंटरनेटची पुढचं व्हर्जन म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
Decentraland मध्ये एक कंपाऊंड बांधलं जात आहे. यात ऑनलाइन मेटाव्हर्सची सुविधा असणार आहे. त्यात प्रवेश करण्यासाठी संगणक किंवा हेडसेटची आवश्यकता असेल. या तंत्रज्ञानावर आधारीत दुतावास barbados मध्ये तयार करण्यात येत आहे.
क्रिप्टो असेट मॅनेजमेंट फर्म ग्रेस्केल नुसार मेटाव्हर्समुळं एक ट्रिलियन डॉलरची कमाई होऊ शकते.
डिजिटल डिप्लोमसीला प्रोत्साहन देणारे गॅब्रिएल आबेद म्हणाले की, आभासी दूतावास भविष्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे.
Metaverse मध्ये तुम्ही क्षणार्धात स्वतःला टेलीपोर्ट करू शकता. तुम्हाला पाहिजे तिथे पोहोचता येते. मग ते तुमचे ऑफिस असो, तुमच्या मित्राचे घर असो किंवा चित्रपटगृह असो.
Metaverse हे असे ठिकाण आहे ज्याला मर्यादा नाही. म्हणजेच इथे तुम्ही कधीही काहीही करू शकता.
1992 मध्ये विज्ञान कथा लेखक नील स्टीफन्सन यांनी 'स्नो क्रॅश' नावाची कादंबरी लिहिली होती. या कादंबरीत 'मेटाव्हर्स' हे नाव पहिल्यांदाच आलं होतं.
कादंबरीत लेखकाने इंटरनेटच्या अशा जगाची कल्पना केली आहे, ज्यामध्ये माणूस घरी बसू शकतो पण त्याची 3D प्रतिमा जगात कुठेही पोहोचू शकते.
क्रिप्टोकरन्सीचाही उल्लेख यापूर्वी एका कादंबरीत करण्यात आला होता.
आज तंत्रज्ञानाच्या विकासामुळे क्रिप्टोकरन्सी एक वास्तविकता बनली आहे. अशा स्थितीत आगामी काळात मेटाव्हर्सही वास्तवात उतरेल, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे.