different types of shoes and sneakers which will make you look attractive
'हे' हटके बूट पाहून तुम्ही नक्कीच चक्रावून जाल By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 03:21 PM2018-10-17T15:21:02+5:302018-10-17T15:47:25+5:30Join usJoin usNext सुंदर दिसण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. आपल्या कपड्यासोबतच फूटवेअरलाही विशेष महत्त्व असते. मात्र आज काही हटके फूटवेअरबाबत जाणून घेऊया. हटके बूट घालून तुम्ही जर बाहेर गेलात तर लोक नक्कीच तुमच्याकडे कुतुहलाने पाहतील यात शंका नाही. असे अजब बूट खरेदी करण्यासाठी कोणत्याही दुकानात जाण्याची गरज नाही. कारण याची ऑनलाईन खरेदी करता येते. अशा प्रकारचे हटके बूट घातल्यानंतर तुमच्या पायाचं संपूर्ण वजन हे तुमच्या पायाच्या पुढच्या भागावर येतं. सुरुवातीला हे बूट पाहताना ते थोडे विचित्र वाटतील. मात्र खाली त्याला चप्पलचा आकार देण्यात आला आहे. या बुटाची लांबी पाहताच आश्चर्याचा धक्का बसेल कारण इतके लांब बूट याआधी कधी पाहीलेच नसतील. बुटाचे डिझाईन आणि रंगसंगती पाहून अशा स्वरुपाचे बूट तयार करण्यासाठी किती डोकं लावावं लागलं असेल याची कल्पना येते. टॅग्स :जरा हटकेJara hatke