diy garden decoration ideas for home
लय भारी! गार्डन डेकोरेशनसाठी हटके आणि यूनिक आयडिया By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 11:34 AM2019-11-13T11:34:08+5:302019-11-13T11:54:37+5:30Join usJoin usNext घर सुंदर दिसावं यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. घराबाहेर एखादं छानसं गार्डन असल्यास घराला आणखी जास्त शोभा येते. घरातील गॅलरीमध्ये अथवा गार्डनमध्ये अनेक रोपं लावता येतात. टाकाऊ वस्तूंच्या वापर करून गार्डनला हटके लूक कसा द्यायचा हे जाणून घेऊया. घरामध्ये काही जुने टायर असतील तर त्याला सुंदर रंग द्या आणि फ्लॉवर डेकोरोशनसाठी त्याचा वापर करा. लाकडाच्या वस्तू या जुन्या झाल्या की त्या फेकून दिल्या जातात. मात्र असं न करता जुन्या फर्निचर अथवा ड्रेसिंग टेबलचा अशा पद्धतीने वापर करा. घरातील जुने डबे अथवा कंटेनरचा वापर करून सुंदर आणि आकर्षक वस्तू तयार करता येतात. जुनी सायकल असल्यास गार्डन डेकोरेशनसाठी त्याचा वापर करा. गार्डन डेकोरेशनसाठी आणखी काही यूनिक आणि हटके आयडिया टॅग्स :घरHome