Airplane Horn Facts: विमानाला हॉर्न असतो का? असतो तर नेमका केव्हा वापरतात, त्याचा उपयोग काय? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 05:39 PM 2021-09-17T17:39:09+5:30 2021-09-17T17:45:50+5:30
Airplane Horn Facts: विमानला हॉर्न असतो का? तुम्हाला माहित्येय का? जर उत्तर हो असेल तर त्याचा नेमका काय उपयोग होतो आणि तो कसा वापरता जातो? सारंकाही जाणून घेऊयात.... रस्ते वाहतूक असो, जलवाहतूक असो किंवा मग रेल्वे वाहतूक वाहनं, रेल्वे आणि जहाजांना हॉर्न असतो हे आपल्याला माहित आहे. पण हवाई वाहतूकीत विमानांना हॉर्नची गरज भासते का? मूळात विमानाला हॉर्न असतो का? हे आपण जाणून घेणार आहोत.
विमानाला हॉर्न असतो की नाही याची माहिती अनेकांना नसते. तर याचं उत्तर आहे. हो. विमानाला हॉर्न असतो. त्याचा नेमका कसा आणि केव्हा वापर केला जातो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे.
तांत्रिकदृष्ट्या पाहायचं झालं तर विमानाला हॉर्न असतो. पण तो सामान्य वाहनांसारखा नसतो. तसंच प्रवासादरम्यान अडथळा ठरणाऱ्या पक्षी किंवा इतर विमानांना बाजूला सारण्यासाठी तो वापरला जातो असं नाही. विमानाचा हॉर्न हवेत वाजवला जातच नाही.
विमानाचा हॉर्न नेमकं काय काम करतो? विमानाचा हॉर्न एक अलर्ट देण्याचं काम करतो. या हॉर्नच्या माध्यमातून केबिनमधून विमानातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला जातो. कोणतीही अडचण आल्यास हॉर्न वाजवून कर्मचाऱ्यांना अलर्ट केलं जातं.
यासोबतच विमानात बाहेरील बाजूसही एक हॉर्न असतो. या हॉर्नचा वापर विमानतळावर केला जातो.
विमान टेकऑफ घेण्यासाठी सज्ज असल्याची सूचना विमानतळावरील कर्मचाऱ्यांना देण्यासाठी हॉर्नचा वापर केला जातो. त्यानंतरच विमानाचं उड्डाण होतं. विमानाच्या बाहेरील बाजूस असलेला हॉर्न सामान्य हॉर्न प्रमाणेच असतो आणि तो विमानाच्या चाकांजवळ बसवलेला असतो.
विमानाच्या चाकांजवळ असलेला हॉर्नचे प्रकार हे वेगवेगळे असू शकतात. ते विमान निर्मात्या कंपनीवर अवलंबून असतं. प्रत्येक कंपनीचा हॉर्न वेगळ्या आवाजाचा आणि वेगळा पद्धतीचा असतो.
विमानातील हॉर्न एक प्रकारे अलार्म बटणच्या पद्धतीनं वापरला जातो असं आपण म्हणू शकतो. यामाध्यमातून विमानातील कर्मचाऱ्यांना सूचना किंवा अलर्ट देण्यासाठी तो उपयोगी ठरतो.
विमानातील हॉर्नचा प्रकार विमानाच्या प्रकारावरही अवलंबून असतो. प्रवासी, कार्गो, लढाऊ, कॉर्पोरेट अशा विविध उद्देशांसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा हॉर्न असतो.