Dogs commit suicide by jumping from this bridge myb
माणसंच नाही, तर कुत्रेसुद्धा 'या' पुलावरून आत्महत्या करतात, काय असेल कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 03:51 PM2020-03-15T15:51:16+5:302020-03-15T16:21:43+5:30Join usJoin usNext आत्महत्या ही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सगळ्यात वाईट घटना असते. अनेक दबावांना बळी पडून किंवा ताण-ताणावानां कंटाळून एखादी व्यक्ती आत्महत्या करत असते. तुम्हाला माहितही नसेल पण जगात कित्येक ठिकाण ही स्युसाईड स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहेत, जिथे माणसंही आत्महत्या करण्यासाठीच जातात. पोलिसांनी तसेच सुरक्षा व्यवस्थांनी यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला पण तरीही आत्महत्यांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. आज आम्ही तुम्हाला अश्याच काही रहस्यमय घटनांबद्दल सांगणार आहोत. आपल्या देशात पाळीव प्राण्यांवर प्रेम करत असलेल्या लोकांची संख्या खूप आहे. शिवाय या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी किंवा संवर्धनासाठी कित्येक संस्था तसेच एनजीओ कार्यरत असतात! पण तुमचा विश्वासही बसणार नाही परदेशातील एका ठिकाणी कुत्रे सुद्धा आत्मह्त्या करतात. स्कॉटलंडच्या डांबार्टन जवळ मिल्टन नावाचे गाव आहे. येथे एक पूल आहे जो कुत्र्यांना आत्महत्या करण्यासाठी आपल्याकडे जवळ ओढत असतो. ६० च्या दशकापासून आतापर्यंत ह्या पुलावरून उडी मारून जवळपास ६०० कुत्र्यांनी आत्महत्या केली आहे. १८५९ मध्ये बनवल्या गेलेल्या ह्या पुलाचे नाव ओवरटॉन पुल आहे. १९५० ते १९६० च्या दशकामध्ये याला पहिल्यांदा कुत्र्यांच्या आत्महत्या होतात हे लक्षात आले. आत्महत्या म्हटलं जाण्याचं कारण असं की पुलावरून कुत्रे कोणत्याही कारणाशिवाय अचानक उडी मारतात आणि ५० फूट उंचावरून पडून त्यांचा मृत्यू होतो. काही केसेसमध्ये जर उडी मारून जर एखादा कुत्रा जिवंत राहिलाच तरी तो पुन्हा पुलावरून उडी मारून आत्महत्या करत असे. सारख्या होणाऱ्या आत्महत्या बघून ह्या पुलावर चेतावनी देणारा बोर्ड लावण्यात आला होता. सर्व आत्महत्या ओवरटॉन पुलाच्या एकाच बाजूने केल्या गेल्या होत्या आणि खास करून एकाच जागेवरून केल्या गेल्या होत्या. त्यामुळे या दगडी पुलामध्ये नक्की काय रहस्य आहे. जे या कुत्र्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे, त्याचा शोध आजही सुरु आहे. काही लोकांचे म्हणणे आहे कि, या पुलावर वाईट शक्तीचे सावट आहे. १९९४ मध्ये एका माणसाने आपल्या मुलाला ओवरटॉन पुलावरून खाली फेकून दिले होते आणि सांगितले की तो मुलगा अँटी क्राईस्ट आहे.नंतर काही महिन्यांनी त्या माणसाने ही त्याच पुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती. असं म्हणतात की ओवरटॉन पूल अशा जागेवर आहे, जिथे जिवंत आणि मृत व्यक्तींचे जग एकत्र येते. तसंच असे मानलं जातं की, माणसाला न दिसणाऱ्या गोष्टी कुत्र्यांना चांगल्याप्रकारे जाणवतात.या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन या पुलावर बोर्ड लावून आपल्या कुत्र्यांना सांभाळून सावधानी बाळगून ठेवण्यास सांगितले आहे. पण तरीही आज सुद्धा हा पूल रहस्यमय आहे. कोणालाही याचं कारण शोधता आलेलं नाही.टॅग्स :जरा हटकेJara hatke