पृथ्वीवरचा 'मंगळ'; काही दशकांपर्यंत पावसाचा थेंबही पडत नाही By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 03:29 PM 2020-01-03T15:29:55+5:30 2020-01-03T15:35:36+5:30
लाल रंगाची माती, काळ्या रंगाचा ज्वालामुखीच्या लाव्हारसाने बनलेली वाळू आणि डोंगरदऱ्या. असे वातावरण पृथ्वीपासून लाखो मैल दूर असलेल्या मंगळ ग्रहावरच असते. नाही, असे वातावरण पृथ्वीवरही आहे. तुम्हाला मंगळावर जायची इच्छा असल्यास या उत्तरी आईसलँडला भेट द्या. मंगळावर गेल्याचे समाधान नक्कीच वाटेल.
चिलीच्या युनगे भागामध्ये हा विचित्र भूप्रदेश आहे. कोणे एके काळी या भागात तांब्याच्या खाणी होत्या ज्या आता बंद झाल्या आहेत. ही जागा चिलीच्या एंटोफागस्टा शहराच्या दक्षिणेला आहे. हा भाग जगातील सर्वात दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.
काही दशकांपर्यंत या भागात पावसाचा एक थेंबही पडत नाही. सरासरी 10 मिमीचा पाऊस होते. यामुळे या भागातील माती कोरडीठाक आहे. जगभरातील अशी ठिकाणे शोधणारी वैज्ञानिक क्लेयर कजिन्स सांगतात की, वरून पाहिल्यावर ही जागा मंगळ ग्रहासारखी भासते.
रात्री या ठिकाणचे तापमान 0 डिग्री तर दिवसाचे तापमान 40 डिग्री सेल्सिअसवर पोहोचते. तर मंगळ ग्रहाचे तापमान उणे 195 डिग्री ते 20 डिग्रीच्या मध्ये असते. मात्र, अटाकामाच्या मातीचा रंग अगदी मंगळासारखाच असतो.
यामुळे नासाने आणि युरोपीय स्पेस एजन्सीने मंगळ ग्रहावर पाठविण्यात येणाऱ्या यानांची चाचणी याठिकाणी घेतली होती.
नासाने या ठिकाणी खोदकाम करून अजब असे जिवाणू शोधले होते. यानंतर मंगळ ग्रहावरही जीवसृष्टी असण्याची शक्यता बळावली होती.
या ठिकाणी मंगळाएवढी थंडी पडत नाही.